India Women Hockey Team Dainik Gomantak
क्रीडा

Indian Women Hockey संघाचा जपानला पराभवाचा धक्का, ग्रुपमध्येही गाठले अव्वल स्थान

नेशन कप 2022 मध्ये भारतीय हॉकी संघाने सोमवारी जपानला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

FIH Women's Nations Cup 2022: स्पेनमध्ये सुरू असलेल्या महिला नेशन कप 2022 स्पर्धेत भारतीय हॉकी महिला संघाने सोमवारी जपानला 2-1 अशा फरकाने पराभूत केले आहे. भारताचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. त्यामुळे ग्रुप बी मध्ये भारतीय संघ आता दोन विजय मिळवून 6 गुणांसह अव्वल क्रमांकावर आले आहेत.

भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चिलीला 3-1 अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर आता जपानलाही भारताने पराभूत करत आपला दमदार फॉर्म दाखवला आहे. जपान विरुद्ध भारताकडून सलीमा टेटे (5') आणि ब्युटी डुंगडुंग (40') यांनी गोल केले. तसेच जपानसाठी रुई ताकाशिमाने (49') एकमेव गोल केला.

भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. त्यामुळे भारताकडे चांगल्या संधी आल्या. दरम्यान 5 व्या मिनिटाला टेटेने चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवत जपानची गोलरक्षक ईका नाकामुराला चूकवत गोल नोंदवला. त्यानंतर पहिल्याच क्वार्टरच्या अखेरीस जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र, भारताच्या बचावाने चांगली कामगिरी करत गोल रोखला.

दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या, मात्र त्या संधींवर गोल करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्येही मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरने ड्रॅगफ्लिकचा शॉट मारत गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चेंडू क्रॉसबारच्या वर गेला. अखेर 40 व्या मिनिटाला पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या ब्युटीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

पण, अखेरच्या क्वार्टरमध्ये जपानने गोलफरक कमी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला 49 व्या मिनिटाला यश मिळाले. ताकाशिमाने जपानसाठी पहिला गोल नोंदवला. मात्र, जपानला नंतर भारताची आघाडी भरून काढता आली नाही. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला.

आता भारताला या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना 14 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT