Jemimah Rodrigues Dainik Gomantak
क्रीडा

...म्हणून महिला क्रिकेटपटू खेळणार हॉकी

21 वर्षीय रॉड्रिग्ज शालेय जीवनात हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असे.

दैनिक गोमन्तक

भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) लवकरच क्रिकेटनंतर हॉकी (Hockey) खेळताना दिसणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या ICC महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने ती निराश आहे. मात्र आता आपला दुसरा आवडता खेळ हॉकी खेळण्याचा निर्णय तीने घेतला आहे. रॉड्रिग्स 11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील (Mumbai) विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना रिंक स्पर्धेत अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स टीमकडून हॉकी खेळताना दिसणार आहे. तीच्या हॉकी संघाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. या फोटोमध्ये रॉड्रिग्सने पोस्टमध्ये हॉकी स्टिक पकडली आहे.

रॉड्रिग्स शाळेत हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळायची

21 वर्षीय रॉड्रिग्ज शालेय जीवनात हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळत असे. आठ वर्षांची असताना तिने शाळेत हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळायला सुरुवात केली. क्रिकेटमध्ये उच्च स्तरावर पोहोचण्यापूर्वी, ती मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (MAASA) मध्ये इंटर स्कूल लीग स्तरावर वांद्रे येथील सेंट जोसेफ स्कूलकडून खेळली. याशिवाय तिने हॉकीमध्ये 17 वर्षांखालील स्तरावर मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. आजकाल ती ड्रिब्लिंग, पासिंग याशिवाय स्कोअरिंगचा सराव करत आहे.

रॉड्रिग्सने भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघासाठी 21 एकदिवसीय आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने अनुक्रमे 394 धावा आणि 1055 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT