Goa cricket team Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या मदतीला एकनाथ, ओडिशाचीही घसरगुंडी

गोव्याने 4 विकेट 23 धावांत गमावल्या

दैनिक गोमन्तक

पणजी : यष्टिरक्षक फलंदाज एकनाथ केरकर याने झुंजार अर्धशतक नोंदवत तळाच्या फलंदाजांसह किल्ला लढवल, त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेच्या एलिट ड गट सामन्यात गोव्याला थोडेफार सावरता आले. नंतर सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी ओडिशाचीही घसरगुंडी उडाली.

मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर गोव्याचा संघ तब्बल दोन वर्षांनंतर रणजी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. गोव्याची मध्यफळी कोसळली, त्यानंतरही जिद्द कायम राखत एकनाथने 76 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे गोव्याला (goa) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याला पहिल्या डावात 6 बाद 63 वरून 181 धावांची मजल मारता आली. नंतर लक्षय गर्ग (2-9) व शुभम रांजणे (1-2) यांनी दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ओडिशाची (Odisha) स्थिती 3 बाद 23 अशी नाजूक केली. गोव्याचा संघ अजून 158 धावांनी पुढे आहे. 14 धावांवर नाबाद असलेला कर्णधार सुभ्रांशू सेनापती याच्यावर ओडिशाच्या आशा आहेत.

एकनाथने श्रीकांत वाघ (19) याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी 53 धावांची, तर अमूल्य पांड्रेकर (नाबाद 27) याच्यासह शेवटच्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. चहापानानंतरच्या पहिल्याच षटकात देबब्रत प्रधान याने एकनाथला यष्टिरक्षक राजेश धुपर याच्याकरवी झेलबाद करून गोव्याला डाव संपविला. एकनाथने 113 चेंडूंतील खेळीत 12 चौकार व एक षटकार मारला.

उपाहारापूर्वीच घसरगुंडी

गोव्याची सुरवात निराशाजनक ठरला. सुमीरन आमोणकर (4) लवकर बाद झाल्यानंतर अमोघ देसाई (13) व सुयश प्रभुदेसाई (19) यांनी डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर गोव्याची फलंदाजी कोसळली. सुयशला राजेश मोहंतीने बाद केल्यानंतर अमोघ धावबाद झाला. नंतर कर्णधार स्नेहल कवठणकर (12) व शुभम रांजणे (6) लवकर परल्यामुळे गोव्याची उपाहारापूर्वीच 5 बाद 59 अशी स्थिती झाली. उपाहारानंतर पहिल्याच षटकात दर्शन मिसाळ शून्यावर बाद झाल्यानंतर गोव्याचा डाव 6 बाद 63 असा संकटात सापडला. गोव्याने 4 विकेट 23 धावांत गमावल्या. नंतर एकनाथने किल्ला लढवत गोव्याचा डाव पुढे रेटला. श्रीकांत वाघ बाद झाल्यानंतर अभिषेक राऊत याने लागोपाठच्या चेंडूवर लक्षय गर्ग (2) व अमित यादव (0) यांना बाद केल्यामुळे गोव्याची पुन्हा 9 बाद 140 अशी घसरगुंडी उडाली. अखेरीस अमूल्यने एकनाथला दमदार साथ दिली.

गोवा, पहिला डाव ः 64 षटकांत सर्वबाद 181 (अमोघ देसाई 13, सुमीरन आमोणकर 4, सुयश प्रभुदेसाई 19, स्नेहल कवठणकर 12, शुभम रांजणे 6, एकनाथ केरकर 76, दर्शन मिसाळ 0, श्रीकांत वाघ 19, लक्षय गर्ग 2, अमित यादव 0, अमूल्य पांड्रेकर नाबाद 27, बसंत मोहंती 18-8-27-3, राजेश मोहंती 15-4-४८-१, आशिष राय १४-३-44-1, देबब्रत प्रधान 8-2-28-1, अभिषेक राऊत 6-1-20-2, गोविंद पोद्दार 3-0-11-0).

ओडिशा, पहिला डाव ः 13.2 षटकांत 3 बाद 23 (शंतनू मिश्रा 6, अनुराग सारंगी 1, संदीप पटनाईक 0, सुभ्रांशू सेनापती नाबाद 14, श्रीकांत वाघ 5-4-5-0, लक्षय गर्ग 5-1-9-2, दर्शन मिसाळ 2-1-7-0, शुभम रांजणे 1.2-0-2-1).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT