मुरगाव राष्ट्रीय महामार्गावरून अधिकारी नागरिकांवर नाराज

पादचार्‍यांचा अपघात झाल्यास दोषी पादचारीचं ठरणार
Mormugao National Highway
Mormugao National HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

वेर्णा ते मुरगाव बंदर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गातील वास्को गांधीनगर ते बायणा-देस्तेरो उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्याने, येथे अवजड वाहनांबरोबर इतर वाहने जाण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गांधीनगर ते बायणा-देस्तेरो राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर वाहन चालक वाहने पार्क करतात. नागरिक उभे राहतात, चालतात हे एकदम चुकीचे असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमर्फत कळवण्यात आले आहे.

तसेच याविषयी गांधीनगर व देस्तेरो येथे दोन्ही विभागात तर्फे सूचनाफलक लावल्याने या उड्डाणपुलाचा पर्यटक स्थळ म्हणून जनतेने उपयोग करू नये असे आवाहन विभागातर्फे केले आहे. उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येत असल्याने पादचार्‍यांचा अपघात झाल्यास दोषी पादचारी ठरेल असेही दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना तर्फे सांगण्यात आले आहे.

Mormugao National Highway
'असा' उमेदवार काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ

मुरगाव (Mormugao) बदरा पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांबरोबर इतर वाहनांना वास्को गांधीनगर ते बायणा देस्तेरो सडा पर्यंत सुरू करण्यात आल्याने, वास्को शहरातील काही प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा कमी झाली आहे. वास्को गांधीनगर ते मुरगाव सडा पर्यंत राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदर वास्को गांधीनगर ते बायणा देस्तेरो पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर नागरिकांनी या उड्डाणपुलाचा पर्यटक स्थळ म्हणून समजून उपयोग करू लागल्याने एका प्रकारे राष्ट्रीय महामार्गाचा दुरुपयोग करीत असल्याचे संबंधित विभागाच्या नजरेस येताच, त्यांनी वास्को गांधीनगर व देस्तेरो येथे उड्डाणपुलावर वाहने पार्क करू नये, नागरिकांनी चालण्यास मनाई असे फलक लावले आहे.

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) प्राधिकरणाने व राज्य सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी संयुक्तरित्या संपूर्ण मार्ग महामार्गाची पाहणी करून हा निर्णय घेतला असल्याची माहिती दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mormugao National Highway
हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी बढतीसाठी गोव्याच्या दोन वकिलांचा समावेश

वेर्णा ते मुरगाव बंदर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गवर वाहनचालक वाहने पार्क करणे हा सुद्धा गुन्हा असल्याची माहिती दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. मुरगाव पोलीसतर्फे उड्डाणपुलावर वाहने पार्क करण्यात येणाऱ्या वाहन चालकांना दंड दिला जातो. तसेच अनेक नागरी उड्डाण पुलावर येऊन पर्यटक स्थळ समजल्या सारखे वावरत आहेत. जर एखाद्या वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेल्या पादचाऱ्यांना ठोकर दिल्यास या अपघाताला वाहन चालक जबाबदार नसून पादचाऱ्यांची चूक म्हणून पोलीस नमूद करणार आहे.

कारण राष्ट्रीय महामार्गावर व राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर चालणे, उभे राहणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियमात बसत नाही. यासाठी वास्को गांधीनगर ते बायणा- देस्तेरो राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावर वाहने पार्क करू नये किंवा पर्यटक स्थळ म्हणून नागरिकांना मजा घेऊ नये. अपघात घडल्यास पादचाऱ्यांवरच गुन्हा होऊ शकतो अशी माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com