Sameer Banerjee Dainik Gomantak
क्रीडा

Wimbledon Tournament: समीर बॅनर्जी ठरला कुमार गटातील एकेरीचा विजेता

भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जी (Sameer Banerjee) याने रविवारी विम्बल्डन (Wimbledon) येथे इतिहास रचला.

दैनिक गोमन्तक

भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जी (Sameer Banerjee) याने रविवारी विम्बल्डन (Wimbledon) येथे इतिहास रचला. त्याने अंतिम सामन्यात त्याचाच देशबांधव असलेल्या विक्टर लिलोव्हला (Viktor lilovhala) सरळ सेटमध्ये पराभूत केले. विम्बल्डनमधील कुमार गटातील एकेरीचे विजेतेपद पटकावले. दुसर्‍या कुमार गटातील ग्रँड स्लॅम खेळणार्‍या 17 वर्षीय समीर बनर्जिने अंतिम सामन्यात 1 तास 22 मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात 7-5, 6-3 अश्या सरळ सेट मध्ये विजय संपादन केला.

समीर बॅनर्जीचे पालक भारतीय असून ते 1980 च्या दशकात ते अमेरिकेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले. या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या ज्युनियर फ्रेंच ओपनमध्ये समीरला विशेष कामगिरी करता आली नाही व तो पहिल्या फेरीतच बाद झाला होता. पण त्यानंतर त्याने हार न मानता विम्बल्डन स्पर्धेमध्ये कुमार गटातील एकेरीचे पदक पटकावून विजयश्री हसिल केली.

भारतातर्फे कुमार गटातील एकेरीचे विजेतेपद जिंकणारा युकी भांब्री हा एकमेव टेनिसपटू आहे त्याने २००९ च्या ऑस्ट्रेलियायी ओपन जिंकण्याचा पराक्रम केला होता. रामनाथन कृष्णन 1954 मध्ये कुमार गटातील विम्बलडन चैम्पियनशिप ग्रँडस्लॅम जिंकणारे पाहिले भारतीय टेनिसपटू होते. लियांडर पेसने 1990 मध्ये विम्बल्डन ओपन व यूएस ओपन स्पर्धेच्या कुमार एकेरी गटात विजय मिळवला होता, तसेच त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे कुमार गटात उपविजेतेपद मिळवले होते. 2015 मध्ये सुमित नागल या टेनिसपटूने व्हिएतनामच्या ली होआंग सोबत विम्बल्डन कुमार गटातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT