Euro 2020 : ऑलिंपिकनंतर आता युरो कपवर देखील कोरोनाचे सावट

17 जूनला कोपेनहेगन येथे झालेल्या सामन्यात पारकेन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तीन समर्थकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
युरो कप २०२० मध्ये डेन्मार्कच्या तीन चाहत्यांना डेल्टा कोरोना विषाणूची लागण.
युरो कप २०२० मध्ये डेन्मार्कच्या तीन चाहत्यांना डेल्टा कोरोना विषाणूची लागण.दैनिक गोन्मतक

कोपेनहेगन : ऑलिंपिक स्पर्धेवर जसे कोरोनाचे सावट आहे. त्याप्रमाणेच आता युरो कप २०२० वर देखील कोरोनाचे वादळ घोंगाऊ लागले आहे. बेल्जियम विरुध्द डेन्मार्क या सामन्यात डेन्मार्कच्या तीन चाहत्यांना डेल्टा कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आली आहे. अशी माहिती डॅनिश आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सामन्यादरम्यान, संक्रमित झालेल्या तिन्ही लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना माहिती देण्यात आली आहे. असे डेनिश एजन्सी फॉर पेशंट सेफ्टीचे संचालक अ‍ॅनेट लिक्के पेट्री हिने सांगितले आहे.

युरो कप २०२० मध्ये डेन्मार्कच्या तीन चाहत्यांना डेल्टा कोरोना विषाणूची लागण.
टोकियो ऑलिम्पिकमधून उत्तर कोरियाची माघार

अ‍ॅनेट लिक्के पेट्री म्हणाल्या, 17 जूनला कोपेनहेगन येथे झालेल्या सामन्यात पारकेन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तीन समर्थकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या व्यक्ती मैदानात वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. त्यामुळे स्टेडियममधील ४ हजार लोकांची चाचणी करणे आवश्यक आहे.

एजन्सीने म्हणले आहे की, डॅन्मार्क येथे झालेल्या सामन्यात तीन युरोपियन चॅम्पियनशिप सामन्यात कोरोनाची २९ प्रकरणे समोर आली. डेन्मार्कमध्ये कोरोनाच्या सध्या २०० केसेस आहेत. बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःचे गृह विलगीकरण करावे असे डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी अवाहन केले आहे. शनिवारी डेन्मार्क विरुध्द वेल्सचा सामना नेदरलँडयेथील अ‍ॅमस्टरडॅम मध्ये होणार आहे. त्या सामन्याची ४ हजार ४०० तिकीटे आरक्षित झाली आहेत. परंतु या सामन्यानंतर डेन्मार्कच्या चाहत्यांना विलगिकरण टाळायचे असल्यास त्यांना नेदरलँडमध्ये १२ तासांपेक्षा जास्त वेळ थांबता येणार नाही असे डेन्मार्कच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com