Team India  Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखणार का?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील एकदिवसीय सामना 19 मार्चला शनिवारी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

महिला विश्वचषक 2022 मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून 2017 च्या विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती टीम इंडियाला करायची आहे. गेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेत भारताने चारपैकी दोन सामने गमावले आहेत, तर दोन जिंकले आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे.

कधी होणार सामना?
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील एकदिवसीय सामना 19 मार्चला म्हणजेच शनिवारी होणार आहे.

कुठे होणार होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील विश्वचषक सामना ऑकलंडच्या ईडन पार्कवर होणार आहे. या सामन्यात भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता नाणेफेक होणार असून पहिला चेंडू संध्याकाळी 6.30 वाजता टाकला जाणार आहे. सामना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित केला जाईल. याचबरोबर सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील हॉटस्टार अ‍ॅपवर देखील येईल.

भारताचा संभाव्य संघ
मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (डब्ल्यूके), स्नेह राणा, पूजा वस्त्राकार, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ
रेचेल हेन्स, अ‍ॅलिसा हिली (wk), मेग लॅनिंग (c), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, अ‍ॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शूट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT