Narendra Modi Stadium Dainik Gomantak
क्रीडा

IPL Final 2022 पाहण्यासाठी लागणार PM मोदी आणि गृहमंत्र्यांची हजेरी? बंदोबस्तात वाढ

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत पार पडणार आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील विजेतेपद मिळवण्यासाठी आज सामना खेळला जाणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत पार पडणार आहे. आज दोन शेजारील राज्यांचे संघ इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पंधरा वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी मिळाली आहे. (Will PM Narendra Modi and Amit Shah be present to watch IPL Final 2022)

तर दुसरीकडे दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलला नवे चॅम्पियन देण्याची संधी आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली गेली आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरणार आहे.

तर दुसरीकडे दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलला नवे चॅम्पियन देण्याची संधी आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली गेली आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरणार आहे.

दरम्यान, गुजरात फायनलमध्ये गेल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही मॅच बघायला येणार, अशी चर्चा संध्या रंगत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरक्षा वाढवली

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. याठिकाणी 6 हजार पोलीस तैनात केले गेले आहेत. विशेष म्हणजे मंत्र्यांसह सिनेसृष्टीतील दिग्ग्गज तारे आणि तारका देखील फायनलसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या काळात 17 डीसीपी, 4 डीआयजीएस, 28 एसीपी, 51 पोलीस निरीक्षक, 268 उपनिरीक्षक, 5 हजार हून अधिक कॉन्स्टेबल, 1 हजार होमगार्ड आणि एसआरपीच्या तीन कंपन्यांचा बंदोबस्त वाढवण्याची देखील शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

कोट्यवधींची बक्षिसे

राजस्थानच्या पराभवानंतर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. आयपीएल हंगामासाठी आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम स्वरुपात देण्यात येणार आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर पराभूत संघाला 13 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा ओबेड मेकॉय,

गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT