Sakshi Malik Dainik Gomantak
क्रीडा

… तोपर्यंत Asian Games मध्ये सहभागी होणार नाही; साक्षी मलिकचा इशारा

Ashutosh Masgaunde

हरियाणातील सोनीपतमध्ये शनिवारी पुन्हा कुस्तीपटूंना पाठींबा देण्यासाठी महापंचायत होणार आहे. या महापंचायतीत सहभागी होण्यासाठी कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाही दाखल झाले आहेत. यावेळी सक्षी मलिकने त्यांचे प्रश्न न सोडवल्यास एशियन गेम्सवर बहिष्कार टाकण्याचा इशार दिला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, तुम्हाला माहित नाही, आम्ही रोज कोणकोणत्या समस्यांना तोंड देत आहोत. जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघणार नाही तोपर्यंत आम्ही एशियन गेम्समध्ये सहभागी होणार नाही.

यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियानेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, आमची सरकारशी जी काही चर्चा झाली आहे. तसेच जे लोक आम्हाला पाठींबा देत आहेत, त्या सर्वांसमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत.

मग ती खाप पंचायत असो की किसान संघटना असो किंवा महिला संघटना असो. शनिवारी होणाऱ्या महापंचायतीमध्ये भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

केव्हा आहेत यंदाच्या एशियन गेम्स?

यंदाच्या म्हणजेच 2023 च्या एशियन गेम्स कंबोडीयातील हांगझाओ शहरात 23 सप्टेबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पार पडणार आहेत.

ब्रिजभूषण शरण सिंग आणि कुस्तीपटूंमधील वाद

अनिश्चित काळासाठी संपावर बसलेले कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरूच आहे.

ब्रिजभूषण यांना तुरुंगात पाठवण्याची आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी कुस्तीपटू करत असतानाच ब्रिजभूषण यांनीही कुस्तीपटूंवर अनेक आरोप केले आहेत. तसेच, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात दोन एफआयआर दाखल करण्यात आले. यापैकी एका अल्पवयीन मुलाच्या आरोपावरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर उर्वरित कुस्तीपटूंच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केल्याने कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत कण्याचा निर्णय मागे घेतला होता.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाची दखल घेत जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती संघटनेची कार्यकारीणी बरखास्त करुन 45 दिवसाच्या आत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT