Mary Kom | Wrestlers Protest vs Brij Bhushan Singh Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest vs Brij Bhushan: '...म्हणून कारवाईची घाई करणार नाही', IOA कमीटी अध्यक्ष मेरी कोमचे भाष्य

ब्रीजभूषण यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी IOA ने नेमलेली कमीटी कशाप्रकारे काम करेल, याबाबत मेरी कोमने माहिती दिली आहे.

Pranali Kodre

Wrestlers Protest vs Brij Bhushan: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय कुस्तीपटूंनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर अंदोलनही केले होते. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) या प्रकरणाच्या तपासणीसाठी 7 सदस्ययी समीती नेमली आहे.

आयओएने नेमलेल्या 7 सदस्ययी समीतीची अध्यक्ष दिग्गज बॉक्सर मेरी कोम असून तिने याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितली आहे की या प्रकरणाची सखोल तपासणी केली जाईल, त्यात कोणत्याप्रकारची घाई केली जाणार नाही.

मेरी कोमने इंडिया टूडेशी बोलताना सांगितले आहे की आरोप गंभीर असून समीती प्रक्रियेनुसार पुढे जाईल, त्याआधी कोणतेही विधान केले जाणार नाही. मेरी कोमने ही प्रतिक्रिया केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपाची चौकशी 4 आठवड्यात पूर्ण झाली पाहिजे, असे सांगितल्यानंतर दिली आहे.

मेरी कोमने म्हटले आहे की 'मी समीतीमधील सदस्यांशी बसून पुढील कारवाईच्या दृष्टीने चर्चा करेल. हा खूप संवेदनशील विषय आहे. त्यामुळे कोणतीही घाई करायची नाही. आम्हाला पहिल्यांदा सर्व प्रकरण नीट समजून घ्यावे लागेल. त्यानंतरच मी मीडियामध्ये विधान करू शकेल.'

(Will not do anything in hurry says IOA committee chief Mary Kom on Indian Wrestlers Protest against Brij Bhushan Singh)

ब्रीजभूषण यांच्याविरुद्ध अंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक, तसेच वर्ल्ड चॅम्पियन विनेश फोगट अशा कुस्तीपटूंचा सहभाग होता. विनेशने आरोप करताना म्हटले होते की नॅशनल कॅम्पवेळी प्रशिक्षक, तसेच ब्रीजभूषण यांच्याकडून महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ होतो.

या प्रकरणाबाबतची चर्चा करण्यासाठी अंदोलक कुस्तीपटू क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनाही भेटले होते. तसेच कुस्तीपटूंनी ब्रीजभूषण यांच्या विरोधात पुरावे असल्याचाही दावा केला आहे. तसेच याबाबत कुस्तीपटूंनी आयओएकडे चौकशीची मागणीही केली होती.

त्यानंतर शुक्रवारी आयओएने 7 सदस्यांची समीती स्थापन केली. या समीतीचे अध्यक्षपद मेरी कोमकडे देण्यात आले, तर अलकनंदा अशोक यांच्याकडे उपाध्यक्षपद देण्यात आले. तसेच या समीतीत डोला बॅनर्जी, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि २ वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT