Brij Bhushan Singh: खेळाडूच्या कानशिलातच वाजवतानाचा Video व्हायरल, नक्की वाचा नेमकं प्रकरण

ब्रीजभूषण सिंग यांचा खेळाडूला कानाखाली वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Brij Bhushan Singh Video
Brij Bhushan Singh VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Brij Bhushan Sharan Singh Video: भारतीय कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर भारतीय कुस्तीपटू गेल्या तीन दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध अंदोलन करत आहेत. अंदोलनात बंजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांसारखे दिग्गज कुस्तीपटू सामील झाले आहेत.

भारतीय कुस्तीपटूंनी महिला कुस्तीपटूंचा ब्रीजभूषण यांच्याकडून लैंगिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. त्याचकारणाने त्यांनी हे अंदोलन केले असून भारतीय कुस्ती महासंघाच्या मॅनेजमेंटमध्ये बदल व्हावा अशी मागणी केली आहे.

याचदरम्यान ब्रीजभूषण यांचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ब्रीजभूषण एका खेळाडूला कानाखाली मारताना दिसत आहेत. या व्हिडिओने त्यांच्याविरुद्ध आणखी खळबळ उडवली आहे.

(Old Video of Brij Bhushan Sharan Singh slapping wrestler Goes Viral)

Brij Bhushan Singh Video
Wrestlers Protest: IOA अध्यक्ष पी.टी उषांकडून कुस्तीपटूंना दिलासा, ' अन्यायाला वाचा...'

या व्हिडिओमधील घटना 2021 साली रांचीतील शहीद गणपत राय इंडोर स्टेडियममध्ये झालेल्या 15 वर्षांखालील कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यानचा आहे. या स्पर्धेसाठी ब्रीजभूषण देखील उपस्थित होते.

या स्पर्धेत उत्तर प्रदेशमधील एक कुस्तीपटूलाही सहभाग घ्यायचा होता. दरम्यान, या स्पर्धेच्या एक दिवस आधी ब्रीजभूषण सिंग स्टेजवर होते. त्यावेळी हा कुस्तीपटू स्टेजवर चढला आणि त्याने ब्रीजभूषण यांना मैदानात उतरण्याची मागणी केली. त्याची ही सातत्याने होणारी मागणी ऐकून ब्रीजभूषण यांचे रागावरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी त्याच्या कानाखाली वाजवली.

त्यानंतर त्या कुस्तीपटूला स्टेडवरून खाली उतरवण्यात आले आणि ब्रीजभूषण यांनाही शांत करण्यात आहे.

Brij Bhushan Singh Video
Brij Bhushan Singh: कुस्ती महासंघांच्या अध्यक्षांविरोधात दिग्गज कुस्तीपटू जंतरमंतरवर, लैंगिक शोषणाचा आरोप

भारतीय कुस्तीपटूंकडून आरोप

दरम्यान, जंतर मंतर मैदानावर अंदोलन करणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंपैकी विनेश फोगटने आरोप केला आहे की नॅशनल कॅम्पमध्ये प्रशिक्षक आणि ब्रीजभूषण यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केले. तसेच याबद्दलचे पुरावे असल्याचा दावाही कुस्तीपटूंनी केला आहे.

दरम्यान ब्रीजभूषण आणि कुस्ती महासंघाला यावर उत्तर देण्यासाठी 72 तासांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच ब्रीजभूषण यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आता ते शुक्रवारी दुपारी या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com