Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेतले जाणार ?

अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मला सध्या ग्रहण लागले आहे. सध्या तो खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्यावर टीका होत आहे.

दैनिक गोमन्तक

अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) फॉर्मला सध्या ग्रहण लागले आहे. सध्या तो खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्यावर टीका होत आहे. कानपूर कसोटीत विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केले. या वर्षी ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळून विराट कोहली परतला तेव्हाही रहाणेने कर्णधारपद भूषवले होते. तो अजूनही संघाचा कर्णधार आहे. मात्र, मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो संघाचा भाग असणार नाही. बीसीसीआयने (BCCI) सामन्याच्या आधी सांगितले की, त्याच्या स्नायूंना ताण आला असल्यानेच तो या सामन्याचा भाग नसणार आहे. रहाणेचा खराब फॉर्म त्याच्यासाठी आपत्ती ठरत आहे. त्यामुळे त्याचे उपकर्णधारपदही धोक्यात आले आहे.

दरम्यान, रहाणेचे उपकर्णधारपदही धोक्यात असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, खराब फॉर्ममुळे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रहाणेला अंतिम-11 मध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्याच्या कसोटी संघाचे उपकर्णधारही अडचणीत आले आहे. जेव्हा केएल राहुल आणि रोहित शर्मा संघात परतले. आता विराट कोहली परत आला आहे. यादरम्यान शुभमन गिल, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर यांनीही आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. ज्यामुळे रहाणेला आता आपोआप पसंती कमी मिळू लागली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत उपकर्णधारपदाचे दावेदार, टी-20 संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल टी-20 संघाचा उपकर्णधारही आहे.

अशी फलंदाजी

रहाणेची फलंदाजी बऱ्याच दिवसांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. तो धावांसाठी झगडत आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर अलीकडेच लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने 61 धावा केल्या. याशिवाय संपूर्ण दौऱ्यात तो अयशस्वी ठरला. त्याआधी तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही अपयशी ठरला होता. त्यापूर्वी इंग्लंडने भारताचा दौरा केला होता. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत रहाणेच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रहाणेने चांगली सुरुवात केली परंतु त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आले नाही आणि 35 धावा करुन तो बाद झाला.

मुंबई कसोटी सुरु होण्यापूर्वी, विराट कोहली या सामन्यातून पुनरागमन करत असताना त्याला प्लेइंग-11 मध्येही स्थान मिळाले. कानपूरमध्ये कोहलीच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक झळकावून आपले स्थान पक्के केले. तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. दुसरा सामना सुरु होण्यापूर्वीच रहाणेच्या स्नायूंना दुखापत झाल्याची बातमी आली आणि त्यामुळे तो हा सामना खेळत नाहीये. रहाणेने मात्र डावाच्या 65व्या षटकानंतर मैदानावर फलंदाजांसाठी टॉवेल आणि पेय आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT