Dean Elgar - Heinrich Klaasen X/ICC
क्रीडा

Cricketer Retirement: एल्गार, वॉर्नरनंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या 'या' स्टार खेळाडूचाही कसोटीला अलविदा!

Heinrich Klaasen: दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Wicket Keeper Heinrich Klaasen announced retirement from Test cricket

कसोटी क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वीच डीन एल्गार आणि डेव्हिड वॉर्नर यांनी निवृत्ती घेतली. आता दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेननेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

साल 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या क्लासेनने चार सामने खेळले असून १०४ धावा केल्या आहेत. क्लासेन नुकतेच भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाचा भाग नव्हता.

मात्र असे असले तरी दक्षिण आफ्रिकेचे कसोटी प्रशिक्षक शुक्री कोनराड यांनी म्हटले होते की तो त्यांच्या योजनेचा भाग आहे. मात्र आता क्लासेनने कसोटीतून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

त्याने निवृत्तीबद्दल म्हटले आहे की 'मी योग्य निर्णय घेतोय की नाही, याबद्दल विचाक करण्यात माझ्या अनेक रात्री गेल्या. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा कठीण निर्णय होता, जो मी घेतला. कारण हा माझा क्रिकेटमधील सर्वात आवडता प्रकार आहे.'

त्याने पुढे म्हटले 'मी मैदानात आणि मैदानाबाहेर जो संघर्ष केला त्याने मी आत्ता आहे, तसा क्रिकेटपटू बनवले. हा खूप चांगला प्रवास होता आणि मला आनंद आहे की मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकलो. मला मिळालेली माझी बॅगी टेस्ट कॅप माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.'

दरम्यान, क्लासेनने त्याच्या कसोटी निवृत्तीचे कारण सांगितले नसले तरी त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

क्लासेनने जरी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो दक्षिण आफ्रिकेकडून वनडे आणि टी20 क्रिकेट खेळले कायम करणार आहे. त्यामुळे तो आगामी काळात दक्षिण आफ्रिका संघाचे वनडे आणि टी20 मध्ये प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT