David Warner Video: टाळ्यांचा कडकडाट अन् डोळ्यात पाणी, वॉर्नरचा कसोटीला निरोप! मैदानातून परतताना छोट्या फॅनलाही गिफ्ट

AUS vs PAK: डेव्हिड वॉर्नर कसोटीतील अखेरची खेळी करून जात असताना संपूर्ण सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टाळ्यांचा कडकडाट झाला होता.
David Warner
David WarnerX/ICC

David Warner Test Retirement:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये कसोटी मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात शनिवारी (6 जानेवारी) ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही 3-0 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, हा सामना दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.

काही महिन्यांपूर्वीच वॉर्नरने तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर कसोटीतून निवृत्ती होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने सिडनीमध्ये त्याच्या घरच्या मैदानात कसोटी क्रिकेटला अलविदा केले.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने मार्नस लॅब्युशेनबरोबर (62*) दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली.

David Warner
David Warner: '...अन् काळजी मिटली', वॉर्नरला शर्थीच्या प्रयत्नांनंतर मिळाली हरवलेली पदार्पणाची कॅप

मात्र, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 11 धावा हव्या असताना साजीद खानने त्याला पायचीत केले. त्याने 75 चेंडूत 57 धावांची अखेरची कसोटीतील खेळी केली. जेव्हा पाकिस्तानने घेतलेल्या डीआरएस रिव्ह्यूमध्ये तो बाद असल्याचे दिसले, त्यावेळी तो मैदानातून परतताना भावूक झाला होता.

त्याला पाकिस्तानच्या खेळाडूंनी कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले. त्यावेळी संपूर्ण स्टेडियममध्येही प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला निरोप दिला. वॉर्नरनेही बॅट उंचावत चाहत्यांच्या प्रेमाचा स्विकार केला.

तसेच भावूक झालेल्या वॉर्नरने हेल्मेटवरील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या लोगोला किस केले आणि बाऊंड्री लाईनपाशी उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथशी गळाभेट घेतली. नंतर पायऱ्या चढत वर जाताना तिथे असलेल्या एका छोट्या मुलाला त्याचे हेल्मेट आणि ग्लव्ह्ज भेट दिले. या भावनिक क्षणांचा व्हिडिओ cricket.com.au ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

David Warner
AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! तिसरी कसोटी जिंकत दिला व्हाईटवॉश

दरम्यान, वॉर्नर बाद झाल्यानंतर लॅब्युशेन आणि स्टीव्ह स्मिथने (4*) ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामना संपल्यानंतर वॉर्नरचे कुंटूंबही मैदानात आले होते. त्यावेळी त्याने कुटुंबाची आणि संघसहकाऱ्यांची भेट घेतली.

वॉर्नरची कसोटी कारकिर्द

वॉर्नरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत  112 कसोटी सामने खेळले असून 44.59 च्या सरासरीने 8786 धावा केल्या आहेत, ज्यात 26 शतके आणि 37 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com