Rohit Sharma | IPL 2023 Captains Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: रोहित का नव्हता 'कॅप्टन्स फोटो'मध्ये? कारण ऐकून मुंबई इंडियन्सच्या फॅन्सलाही येईल टेंशन

आयपीएल 2023 पूर्वी कर्णधारांच्या फोटोशूटसाठी रोहित शर्मा अनुपस्थित होता.

Pranali Kodre

Why Rohit Sharma missing from Captains Photo for IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला या आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होईल. या हंगामासाठी आता सर्व संघांची अंतिम तयारी झाली असून या हंगामासाठी कर्णधारांचे फोटोशूटही करण्यात आले.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्णधारांचे फोटोशूट झाले. कर्णधारांच्या फोटोशूटमधील काही फोटोही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत. मात्र, या शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दिसला नाही. त्यामुळे अनेकांनी याबद्दल विचारणा केली आहे.

पण आता रोहित कर्णधारांच्या फोटोंमध्ये नसल्याचे कारण समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाला एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार रोहित आजारी असल्याने तो अहमदाबादला गेला नव्हता. पण तो २ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणाऱ्या मुंबई इंडियनच्या पहिल्या सामन्याला उपलब्ध असण्याची शक्यता दाट आहे.

बेंगलोर आणि मुंबई यांच्यातील सामना बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे. पण आता या सामन्यापूर्वी रोहित आजारी असल्याने मुंबईचे टेंशन वाढले आहे. याचदरम्यान, अशीही चर्चा आहे की ज्यावेळी रोहितला या आयपीएल हंगामात विश्रांती दिली जाईल, त्यावेळी सूर्यकुमार यादव मुंबईचा प्रभारी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल.

दरम्यान, आयपीएल 2023 स्पर्धेपूर्वी झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटसाठी रोहित व्यतिरिक्त अन्य ९ संघांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 9 खेळाडू उपस्थित होते.

यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन, रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होता.

सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार एडेन मार्करम आहे. मात्र, तो अद्याप भारतात आलेला नसल्याने सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भुवनेश्वर कुमार फोटोशूटसाठी उपलब्ध होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT