Avesh Khan Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction: ऋषभ पंतने आवेश खान ची का मागितली माफी, जाणून घ्या कारण

मुलाखतीदरम्यान आवेश खानने (Avesh Khan) सांगितले की, बसमधून उतरल्यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) मला मिठी मारली आणि खरेदी करु न शकल्याबद्दल सॉरी म्हटले.

दैनिक गोमन्तक

आवेश खान हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला (LSG) 10 कोटी रुपयांना विकत घेतले. तत्पूर्वी, आवेश खान दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) शानदार गोलंदाजी करत होता. सध्या आवेश खान (Avesh Khan) त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे. गेल्या हंगामात त्याने दिल्लीसाठी शानदार गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे यंदा बंगळुरुमधील (Bangalore) लिलावादरम्यान आवेशला आपल्या संघामध्ये घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये होड लागली होती. (Why Rishabh Pant Apologized To Avesh Khan)

दरम्याव बंगळुरुमध्ये आयपीएलचा लिलाव (IPL Auction) सुरु असताना आवेश खान त्याच्या काही सहकारी खेळाडूंसोबत फिरत होता. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) 10 कोटींमध्ये खरेदी करताच सहकारी खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. मात्र कोलकात्यात पोहोचल्यानंतर दिल्लीचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) आवेश खानच्या मनाला स्पर्श करणारा किस्सा सांगितला.

मुलाखतीदरम्यान आवेश खानने (Avesh Khan) सांगितले की, बसमधून उतरल्यानंतर ऋषभ पंतने (Rishabh Pant) मला मिठी मारली आणि खरेदी करु न शकल्याबद्दल सॉरी म्हटले. ऋषभ पंत म्हणाला - सॉरी, तुला घेऊ शकलो नाही. कारण, आमच्याकडे मोठी रक्कम शिल्लक नव्हती. आणि आमच्याकडे खरेदी करण्यासाठी इतरही खेळाडू होते. मी नंतर लिलाव पाहिला तेव्हा मला दिसले की, त्यांनी माझ्यासाठी 8.75 कोटींची अंतिम बोली लावली होती, परंतु शेवटी लखनऊने बाजी मारत सर्वाधिक बोली लावली."

शिवाय, मध्य प्रदेशकडून (Madhya Pradesh) देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आवेश खानसाठी हा खूप भावनिक क्षण होता. ऋषभसोबतचे त्याचे नाते खूप खास असल्याचे त्याने सांगितले. आम्ही दोघे अंडर -19 क्रिकेट एकत्र खेळलो आहोत. सामना संपल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत बसून खूप मजा करायचो.

आवेश म्हणाला की, 'रिकी पाँटिंग यांच्या कोचिंगचीही मला खूप आठवण येईल. दिल्ली कॅपिटल्सशी माझे वेगळे नाते आहे.' आवेशने IPL 2021 मध्ये 16 सामन्यांमध्ये 7.37 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT