बंगळुरुमध्ये दोन दिवस चाललेल्या इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. विकेटकीपर ईशान किशनवर 15.25 कोटींची बोली लागली. दीपक चहरलाही 14 कोटी रुपये मिळाले. फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनवर पैश्यांची बरसात झाली. मात्र फ्रँचायझींनी फिरकीपटूंना निराश केले. मेगा लिलावात 10 कोटी रुपये मिळालेला एकही फिरकी गोलंदाज नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) लिलावात टॉप 5 सर्वात महागडे फिरकीपटू कोण आहेत ते जाणून घ्या... (There Is Not A Single Spin Bowler Who Got Rs 10 Crore In IPL 2022 Mega Auction)
दरम्यान, IPL 2022 च्या लिलावात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला. चहलला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) अवघ्या 6.5 कोटी रुपयांना विकत घेतले. चहलकडे 114 आयपीएल सामन्यांचा अनुभव असून त्याच्या नावावर 139 विकेट्स आहेत, तरीही त्याला मोठी रक्कम मिळू शकली नाही.
तसेच, आयपीएल 2022 च्या लिलावात दुसरा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज राहुल चहर (Rahul Chahar) आहे, ज्याला पंजाब किंग्जने (Punjab Kings) 5.35 कोटी किंमतीत विकत घेतले. राहुल चहरने 42 T20 मध्ये 43 विकेट घेतल्या आहेत.
मार्की खेळाडूंपैकी एक रविचंद्रन अश्विनला अवघे 5 कोटी मिळाले. अश्विनला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. अश्विनच्या नावावर 145 टी-20 विकेट आहेत. मात्र शेवटचा हंगाम त्याच्यासाठी खास नव्हता. त्याला फक्त 7 विकेट्स मिळाल्या. दुसरा डावखुरा फिरकीपटू साई किशोरलाही 3 कोटी रुपये मिळाले आहेत. गुजरात टायटन्सने तामिळनाडूच्या या फिरकीपटूचा आपल्या संघात समावेश करुन घेतला आहे.
शिवाय, डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार हा आयपीएल 2022 च्या लिलावातील चौथा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज आहे. ब्रारला पंजाब किंग्सने आपल्या संघात घेतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.