Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकिस्तानला रातोरात तगडा झटका! भारताविरुद्ध एक गोलंदाज कमी घेऊन खेळणार, कारण...

Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या आशिया चषकातील सुपर फोरचा सामना सुरू असतानाच पाकिस्तानला एका रात्रीत मोठा धक्का बसला आहे.

Pranali Kodre

Why Pakistan Pacer Haris Rauf not playing Against India on Reserve day in Asia Cup 2023 Super Cup:

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात सुपर फोरचा सामना रविवारी सुरु झाला आहे. पण या सामन्यात 24.1 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नव्हता. त्याचमुळे हा उर्वरित सामना सोमवारी राखीव दिवशी खेळवला जात आहे. पण सोमवारी खेळ सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ सोमवारी खेळण्यासाठी उपलब्ध नाही. त्याच्या अनुपलब्धीचे कारण पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने स्पष्ट केले आहे. मॉर्केलने माहिती दिल्यानुसार त्याच्या स्नायुंना ताण आला आहे.

तसेच स्कॅनमध्ये सुज असल्याचेही दिसून आले आहे. त्याचमुळे 5 ऑक्टोबरपासून सुरु होणारा वर्ल्डकप तोंडावर असताना त्याला दुखापत असतानाही खेळण्याची जोखीम पाकिस्तान संघाने न घेण्याचे ठरवले आहे. त्याच्या कोटातील षटके संघातील अन्य खेळाडू मिळून पूर्ण करतील.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हॅरिस रौफचा भारताविरुद्धच्या चालू सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. त्याने रविवारी 5 षटके गोलंदाजी केली होती. ज्यात त्याने 27 धावा दिल्या आहेत. पण आता तो सोमवारी गोलंदाजीसाठी उतरणार नाही, त्यामुळे पाकिस्तानकडे एक गोलंदाज कमी असणार आहे.

विशेष म्हणजे रौफ आशिया चषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, रविवारी पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या आहेत. भारताकडून केएल राहुल 17 धावांवर आणि विराट कोहली 8 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे सोमवारी या धावसंख्येपासूनच पुढे सामना सुरू झाला आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीतही सामना झाला होता. पण हा सामना पहिल्या डावानंतर पावसामुळे रद्द झाला होता. त्यावेळी रौफने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT