Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ...म्हणून बुमराह दुसऱ्या वनडेत भारताकडून खेळणार नाही, BCCI ने सांगितले कारण

Jasprit Bumrah: इंदूरला होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत बुमराह न खेळण्याचे महत्त्वाचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Why Jasprit Bumrah Not Playing India vs Australia 2nd ODI:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू असून दुसरा सामना रविवारी (२४ सप्टेंबर) खेळला जात आहे. इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे, पण या सामन्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुपलब्ध आहे. यामागील कारणही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बुमराह इंदूरला होणाऱ्या दुसऱ्या वनडेपूर्वी त्याच्या घरी रवाना झाला आहे. त्याने संघव्यवस्थापनाकडून छोट्या सुट्टीसाठी मंजुरी मिळवली असून तो कुटुंबाला भेटण्यासाठी गेला आहे.

त्यामुळे वेगवान गोलंदाज मुकेश कुमार त्याचा बदली खेळाडू म्हणून दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात सामील होईल. तसेच बुमराह २७ सप्टेंबर रोजी राजकोटला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात पुन्हा सामील होईल.

बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांना सप्टेंबरच्या सुरुवातीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. बुमराह मुलाच्या जन्मावेळीही दोन-तीन दिवसांची सुट्टी घेऊन घरी गेला होता.

त्याने त्यावेळी आशिया चषकातील नेपाळविरुद्धचा साखळी फेरीचा सामना खेळला नव्हता. पण तो सुपर फोर फेरीवेळी पुन्हा संघात सामील झाला आणि संघाच्या आशिया चषक विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी मुकेश कुमारला बुमराहचा बदली खेळाडू म्हणून संधी दिली असली, तरी त्याचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बुमराहच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णाला खेळवण्यात आले आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये हा एकमेव बदल भारतीय संघात करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी अशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन -

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT