Jasprit Bumrah - Ravindra Jadeja 
क्रीडा

IND vs AFG, T20I: विराट-रोहितचे पुनरागमन, पण जडेजा-बुमराहला का मिळाली नाही टीम इंडियात संधी? कारण आले समोर

India T20I Squad: अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून बुमराह आणि जडेजाला संधी देण्यात आलेली नाही.

Pranali Kodre

India T20I Squad for Series against Afghanistan:

अफगाणिस्तान संघ जानेवारी 2024 महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात भारत आणि अफगाणिस्तान संघात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

भारताच्या या टी20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताच्या टी20 संघाकडून खेळताना दिसणार आहेत.

दरम्यान, असे असले तरी काही वरिष्ठ खेळाडू आहेत, ज्यांना या संघात निवडलेले नाही. यात हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान हार्दिकला घोट्याची दुखापत झाली होती, त्यातून तो अजून सावरलेला नाही. तसेच नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सूर्यकुमार यादवच्या पायालाही दुखापत झाली आहे. त्याचमुळे तोही अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेचा भाग नाही.

याशिवाय इंग्लंडविरुद्ध जानेवारीच्या अखेरीस चालू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या दृष्टीने जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर याच कारणासाठी मोहम्मद सिराजला देखील विश्रांती दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तसेच ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान दुखापत झाली होती, त्यातून तो सावरला नसल्याची शक्यता आहे.

असे असले तरी, ईशान किशन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, दीपक चाहर या खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी का संधी देण्यात आलेली नाही, याबद्दल कारण समोर आलेले नाही.

अफगाणिस्तानविरुद्ध 11, 14 आणि 17 जानेवारी रोजी अनुक्रमे मोलाही, इंदूर आणि बेंगलोर येथे टी20 सामने होणार आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT