Lionel Messi vs Cristiano Ronaldo AFP
क्रीडा

Al-Nassr vs Inter Miami: रोनाल्डो उतरला नाही मैदानात, तर मेस्सीचीही का झाली लेट एन्ट्री, जाणून घ्या कारण

Pranali Kodre

Al-Nassr vs Inter Miami, Lionel Messi vs Cristiano Ronaldo:

गुरुवारी (1 फेब्रुवारी) रियाध कप स्पर्धेदरम्यान अल-नासर आणि इंटर मियामी संघात सामना झाला. रियाधमधील किंगडम एरिना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अल नासरने 6-0 अशा फरकाने विजय मिळवला.

दरम्यान, या सामन्याबद्दल यापूर्वीच मोठ्याप्रमाणात चर्चा झाली होती. कारण फुटबॉल जगतातील दोन दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांची आमने-सामने येण्याची ही कदाचित अखेरची वेळ असू शकते, असे म्हटले जात होते.

रोनाल्डो गेल्या वर्षभरापासून अल-नासर क्लबकडून खेळत आहे, तर गेल्याचवर्षी मेस्सीशी मियामीने करार केला आहे.

त्यामुळे मियामीने केलेल्या सौदी अरेबिया दौऱ्यात रोनाल्डो आणि मेस्सी हे दोन खेळाडू पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील अशी अपेक्षा चाहत्यांना होती.

मात्र सामन्यापूर्वीच चाहत्यांना अपेक्षाभंग झाला. कारण हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होते. रोनाल्डोला अल-नासरच्या चीन दौऱ्यादरम्यान स्नायूंमध्ये ताण आला होता. त्यामुळे तो त्यातून सावरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

मात्र यामुळे त्याला मियामीविरुद्धचा सामना खेळता आला नाही. याशिवाय मेस्सी देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे तोही या सामन्यात 83 व्या मिनिटाला खेळण्यासाठी मैदानात उतरला.

त्यामुळे किमान सामन्याच्या अखेरच्या क्षणी मेस्सीला खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. मात्र, त्यांना रोनाल्डोला या सामन्यात खेळताना पाहाता आले नाही. असे असले तरी रोनाल्डो संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.

या सामन्यात न खेळण्याबद्दल रोनाल्डो म्हणाला, 'मला वाईट वाटत आहे. मला माहित आहे, तुम्हालाही वाईट वाटत आहे. विशेषत: जे लोक ख्रिस्तियानोवर प्रेम करतात. पण आपल्याला यातूनही चांगले पाहावे लागेल.'

'आपण सामना रद्द करू शकत नाही, आपल्याला सामना खेळावाच लागेल. पुनरागमन करू. मला तुमच्यासाठी खेळायचे आहे. मला वाईट वाटत आहे, म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मला आशा आहे की तुम्ही एका फुटबॉलरची परिस्थिती समजून घ्याल.

मियामीचा पराभव

दरम्यान, मियामीविरुद्ध अल-नासरने शानदार सुरुवात केली होती. अल-नासरने पहिल्या १२ मिनिटातच तीन गोल नोंदवले होते. ओटाविओने तिसऱ्याच मिनिटाला, तर तालिस्काने १० व्या आणि आयमेरिक लापोर्टेने 12 व्या मिनिटाला गोल केले.

तालिस्काने नंतर 51 व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि 73 व्या मिनिटाला मैदानी गोल करत गोलची हॅट्रिक केली. तसेच मोहम्मद मारननेही 68 व्या मिनिटाला गोल केला. मात्र, इंटर मियामीकडून कोणालाह गोल करता आला नाही, त्यामुळे अल-नासरने 6-0 असा फरकाने विजय मिळवला.

दरम्यान, सौदी अरेबिया दौऱ्यात इंटर मियामीने पहिला सामना 29 जानेवारीला अल-हिलालविरुद्ध खेळला होता. या सामन्यातही मियामीला 4-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT