Cristiano Ronaldo: जखमी रोनाल्डोचा तो गोल अन् अल-नासरने जिंकला अरब क्लब चॅम्पियन्स कप

Al-Nassr: रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली अल नासरने शनिवारी अरब क्लब चॅम्पियन्स कप 2023 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak

Cristiano Ronaldo's Two Goals help Al-Nassr to win Arab Club Champions Cup 2023:

ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्यावर्षी सौदी अरेबियामधील अल-नासर क्लबशी करार केला होता. त्यानंतर त्याने शनिवारी पहिल्यांदाच या संघासाठी मोठे विजेतेपद जिंकले आहे. रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली अल नासरने शनिवारी अरब क्लब चॅम्पियन्स कप 2023 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

शनिवारी अरब क्लब चॅम्पियन्स कप स्पर्धेचा अंतिम सामना अल-नासर आणि अल-हिलाल या संघात झाला. या सामन्यात 2-1 अशा फरकाने अल-नासरने विजय मिळवला. या विजयात रोनाल्डोचे योगदान महत्त्वाचे राहिले, कारण त्याने अल-नासरकडून दोन्ही गोल केले.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo Video: फॅन्सकडून 'मेस्सी, मेस्सी' ऐकताच रोनाल्डोचा राग अनावर, भर मैदानात केलं 'हे' कृत्य

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आले नव्हते. पण दुसऱ्या हाफमध्ये 51 व्या मिनिटाला अल हिलालला मायकलने गोल करत खाते उघडून दिले. त्यानंतर अल-नासरकडून 74 व्या मिनिटाला रोनाल्डोने पहिला गोल नोंदवला.

शेवटच्या काही मिनिटांमध्ये अल-नासरच्या अब्दुलेला अल-अमरी आणि नवाफ बौंशल यांना रेड कार्ड मिळाले होते. त्यामुळे त्यांना १० खेळाडूंसह हा सामना खेळावा लागला. तरी अल-नासरने चांगला बचाव करत अल हिलालला गोल करून दिला नाही.

सामन्यात निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे अतिरिक्त वेळ महत्त्वाचा ठरणार होता. या वेळेत रोनाल्डोने रिबाऊंडवर गोल नोंदवला. पण अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये रोनाल्डो दुखापतग्रस्त झाला होता. त्याला गोल्फ कार्टवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वी त्याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर अल-नासरने विजयाला गवसणी घातली.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo Record: रोनाल्डोचा भन्नाट हेडर, नवा रेकॉर्ड अन् अल नासरचा जबरदस्त विजय

या विजेतेपदानंतर रोनाल्डोने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की 'ही महत्त्वाची ट्रॉफी संघाला पहिल्यांदा जिंकवून देण्यात योगदान दिल्याबद्दल अत्यंत अभिमान वाटत आहे. या यशात सहभाग असलेल्या क्लबमधील सर्वांचे आणि माझे कुटुंबिय आणि मित्र, जे नेहमी माझ्या बाजूने आहेत, त्यांचे आभार.'

रोनाल्डोने अंतिम सामन्यादरम्यान सर्वाधिक 6 गोल केले. दरम्यान, रोनाल्डोने या सामन्यादरम्यान सर्वाधिक हेडेड गोल करण्याच्या गर्ड मुलरच्या विक्रमाला मागे टाकले. रोनाल्डोने आता 145 हेडेड गोल केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com