Lionel Messi  Dainik Gomantak
क्रीडा

Messi Detained by Chinese Police: मेस्सी विमानतळावर पोहोचताच चिनी पोलिसांनी अडवले, कारणही आले समोर

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी बिजिंगमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी पोहोचला असताना विमानतळावर त्याला चिनी पोलिसांनी अडवले होते.

Pranali Kodre

Lionel Messi detained by Chinese police at Beijing airport: अर्जेंटिना फुटबॉल संघ गुरुवारी (15 जून) ऑस्ट्रेलिया विरुद्ध चीनमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. पण त्यापूर्वीच एक गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सीला बिजिंगमधील विमान तळावर आडवण्यात आले होते. यामागील कारण आता समोर आले आहे.

अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया संघात बिजिंगमधील वर्कर्स स्टेडियमवर गुरुवारी सामना होणार आहे. या सामन्यात मेस्सी विश्वविजेत्या अर्जेंटिनाचे नेतृत्व करणार आहे.

याच सामन्यासाठी अर्जेंटिनाचा संघ बिजिंगला पोहचला आहे. दरम्यान, विमानतळावर पासपोर्ट संदर्भात गोंधळ झाल्याने मेस्सीला चीनच्या पोलिसांनी अडवले होते.

अनेक रिपोर्टनुसार मेस्सीने व्हिसासाठी अर्ज केला नव्हता. मेस्सीकडे अर्जेंटिना आणि स्पॅनिश असे दोन पासपोर्ट आहेत. त्याने चीनला जाताना स्पॅनिश पासपोर्ट आणला होता. पण चीनमध्ये स्पॅनिश पासपोर्टला व्हिसाशिवाय प्रवेश दिला जात नाही.

पण तैवानमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश केला जाऊ शकतो. मेस्सीला वाटले की तैवान चीनचाच भाग आहे, त्यामुळे त्याने व्हिसासाठी अर्ज केला नाही.

तसेच असेही समजले आहे की आधी मेस्सी आणि विमानतळावरील चिनी रक्षकांमध्ये भाषेची समस्या उद्भवली होती. पण ती लवकरच सोडवण्यात आली. त्याला काहीवेळानंतर जलद व्हिसा मिळाला. त्यामुळे आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकतो.

दरम्यान, मेस्सीसाठी बिजिंग खास ठिकाण आहे, कारण याच ठिकाणी त्याने अर्जेंटिनासाठी 2008 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.

मेस्सी आता खेळणार इंटर मियामीकडून

लिओनल मेस्सी गेली दोन वर्षे पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) संघाकडून खेळत होता. पण आता या क्लबचा आणि मेस्सीचा मार्ग वेगळा झाला आहे. त्यामुळे तो आता इंटर मियामी या अमेरिकेतील क्लबकडून खेळणार आहे.

अनेक रिपोर्टनुसार मेस्सीने सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबने दिलेली महागड्या कराराची ऑफर नाकारली आहे. त्यानंतर त्याने आता अमेरिकेत फुटबॉल खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता मेस्सी पहिल्यांदाच युरोपबाहेरील क्लबकडून फुटबॉल खेळताना दिसेल. त्याने यापूर्वी बार्सिलोना आणि पीएसजी या युरोपमधील क्लबकडून फुटबॉल खेळले आहे.

पीएसजीकडून गेल्या दोन हंगामात खेळताना मेस्सीने 75 सामन्यांमध्ये 32 गोल केले. तसेच 35 असिस्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT