Alyssa Healy turn photographer for Team India X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: टीम इंडियाचा फोटो काढताना एलिसा हेलीकडून झाली मोठी चूक, स्वत:च दिली कबुली; पाहा Video

Alyssa Healy: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर कर्णधार एलिसा हेलीने भारतीय महिला संघाचे काही फोटो टिपले होते.

Pranali Kodre

Why Alyssa Healy turn photographer after India Women team won 1st Test Against Australia at Mumbai:

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी डिसेंबर 2023 हा महिना शानदार राहिला आहे. भारताने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला होता. त्यानंतर रविवारी (२४ डिसेंबर) भारतीय महिला संघाने वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवला.

या सामन्यानंतर एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने ८ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली फोटोग्राफर बनली होती. तिने मालिका विजयाची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय संघाचेही काही फोटो काढले. तिच्या या कृतीचे क्रिकेटविश्वातून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. आता तिने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

तिने म्हटले की तिच्याकडून चुकून भारताचे अर्धे खेळाडूही फोटो काढताना कापले गेले आहेत.

ती म्हणाली, 'तो माझा कॅमेरा नव्हता. ते कॅमेरामनला मागे मागे ढकलत होते, त्यामुळे मी विचार केला की मला तिथे फोटो काढण्याची एक संधी मिळाली. मी जवळून काही फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण मी खरंतर चुकून भारतीय संघातील अर्ध्या खेळाडूंना कापले. त्यामुळे मला वाटत नाही की ते फोटो वापरतील.'

दरम्यान, कसोटी सामन्याबद्दल हेली म्हणाली, 'येथे येऊन कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव शानदार होता. इथे जिंकणे सोपे नव्हते. सामन्याचा पहिला दिवस आमच्यासाठी खास नव्हता. बाकी तिन्ही दिवशी आम्ही झुंज दिली. आम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिमान वाटत आहे. इथे कसोटी क्रिकेट खेळण्याची ही आमची पहिलीच संधी होती.'

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात आत्तापर्यंत 11 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 6 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 4 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. यानंतर आता पहिल्यांदाच भारताने विजय मिळवला.

भारताचा विजय

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 77.4 षटकात 219 धावा केल्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 126.3 षटकात सर्वबाद 406 धावा केल्या आणि 187 धावांची आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 105.4 षटकात 261 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावातील 187 धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर अवघे 75 धावांचेच आव्हान ठेवले. हे लक्ष्य भारताने 2 विकेट्सच गमावत 18.4 षटकात पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT