Shahid Afridi  Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup बाबत आफ्रिदीने केले भाकीत, अंतिम फेरीत या 2 संघांची टक्कर

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने काही दिवसांपूर्वी 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघाबाबत भाकित केले होते.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने काही दिवसांपूर्वी 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघाबाबत भाकित केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यंदाच्या T20 विश्वचषकात एकमेकांविरुद्ध अंतिम फेरीत खेळतील असे पॉन्टिंगने म्हटले होते. पाँटिंगच्या या भाकितानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही त्याच्या वतीने टी-20 विश्वचषकाबाबत भविष्यवाणी केली आहे. आफ्रिदीने त्‍याच्‍या वतीने टी-20 विश्वचषक 2022 च्‍या फायनलची घोषणाही केली आहे.

दरम्यान, आफ्रिदीने समा टीव्ही या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर आपले मत मांडले आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणार असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे. शेवटी चॅम्पियन कोण होणार हे आफ्रिदीने सांगितले नसले तरी अंतिम फेरीतील स्पर्धकांबाबत निश्चितच भाकीत केले आहे.

दुसरीकडे, अलीकडच्या काळात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच चाहते आणि समीक्षक विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल सतत चर्चा करत असतात. आता कोहली आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT