Commonwealth Games 2022: मीराबाई चानूने रचला इतिहास, सुवर्णपदक केले नावावर

Mirabai Chanu: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्येही मीराबाईने 'सुवर्णपदक' जिंकत सुवर्ण कामगिरी आपल्या नावावर केली.
Mirabai Chanu
Mirabai ChanuDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mirabai Chanu Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज दुसरा दिवस आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने गोल्डकोस्ट येथे 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यातच कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्येही मीराबाईने 'सुवर्णपदक' जिंकत सुवर्ण कामगिरी आपल्या नावावर केली. यासोबतच मीराबाईने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही मीराबाईकडून अशाच सुवर्ण कामगिरीची अपेक्षा होती.

Mirabai Chanu
Commonwealth Games 2022:बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्सची शानदार सुरूवात, पीव्ही सिंधूने केले भारतीय संघाचे नेतृत्व

मीराबाईची कामगिरी:

  • 1. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. कर्णम मल्लेश्वरीनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी दुसरी भारतीय वेटलिफ्टर

  • 2. 2020 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले

  • 3.2018 गोल्ड कोस्टने सुवर्णपदक जिंकले

  • 4. 2017 च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक

  • 5. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक

Mirabai Chanu
Commonwealth Games 2022: भारतीय बॉक्सर्स मारणार 'गोल्ड पंच', 30 जुलैला रंगणार सामने

ऑलिम्पिकमध्ये मीराबाईचा जलवा

मीराबाईच्या कारकिर्दीतील सर्वात ऐतिहासिक क्षण आला, जेव्हा तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) 49 किलो वजनी गटात भारतासाठी (India) रौप्य पदक जिंकले. यासह मीराबाई ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली. त्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू स्नॅचनंतर दुसऱ्या क्रमांकावर होती. यानंतर मीराबाईने क्लीन अँड जर्कच्या पहिल्या प्रयत्नात 110 किलो तर दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलले होते. मात्र, मीराबाई चानूचा (Mirabai Chanu) तिसरा प्रयत्न फसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com