Vivrant Sharma
Vivrant Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023 मध्ये करोडपती बनलेला जम्मू-काश्मीरचा 'हा' धाकड तुम्हाला माहितीये का?

Pranali Kodre

Vivrant Sharma: कोचीमध्ये शुक्रवारी इंडियन प्रीमीयर लीग 2023 हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. त्यातही विवरांत शर्माच्या बोलीने सर्वांचेच लक्ष वेधले.

या लिलावात 20 लाख मुळ किंमत असलेल्या विवरांत शर्माला तब्बल 2.6 कोटींची बोली लागली. त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केले. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला की हा विवरांत शर्मा कोण आहे.

तर विवरांत हा जम्मू आणि काश्मीरमधील 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आठवड्याभरापूर्वीच मध्यप्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 2 प्रथम श्रेणी सामने, 14 लिस्ट ए सामने आणि 9 टी20 सामने खेळले आहेत.

डावखरी क्रिकेटपटू असलेला विवरांतने गेल्यावर्षी लिस्ट ए आणि टी20 क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीरकडून पदार्पण केले होते. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध आणि टी20 क्रिकेटमध्ये विदर्भाविरुद्ध पदार्पण केले होते.

त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 14 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 519 धावा केल्या आहेत आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 9 टी20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 191 धावा केल्या आहेत आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 2 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 76 धावा केल्या असून 1 विकेट घेतली आहे.

त्याने काही दिवसांपूर्वीच 23 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड विरुद्ध विजय हजारे ट्रॉफी सामन्यात 154 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यावेळी त्याने अनेकांचे लक्ष वेधले होते. आता सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेऊन आयपीएलमध्येही झळकण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात तो काय कमाल करतो, हे पाहाणे रंजक राहाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT