Big Bash league, Unmukt Chand Twitter
क्रीडा

BBL खेळणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला उन्मुक्त चंद कोण आहे?

आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने रचला इतिहास

दैनिक गोमन्तक

Big Bash league, Unmukt Chand: आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने इतिहास रचला आहे. बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळणारा उन्मुक्त हा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू (Cricket) ठरला आहे. मंगळवारी उन्मुक्तने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध मेलबर्न रेनेगेड्सच्या बाजूने मैदानात उतरला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, उन्मुक्तने मेलबर्न रेनेगेड्सशी करार केला होता, आणि त्याला आता प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला क्रिकेटपटूंना महिला बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. परंतु भारतातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पुरुष क्रिकेटपटूंना पुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. युनायटेड स्टेट्समध्ये क्रिकेट करिअर करण्यासाठी उन्मुक्त चंदने गेल्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यामुळे त्याला BBL आणि इतर देशांतर्गत लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

28 वर्षीय उन्मुक्तने अंडर-19 विश्वचषक 2012 च्या अंतिम सामन्यात नाबाद 111 धावांची खेळी करत भारताला चॅम्पियन बनवले होते. त्याने भारत अ संघाचे कर्णधारपदही भूषवले, परंतु त्याला वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

चंदने 2010 मध्ये आपल्या करियरची सुरवात दिल्लीसाठी केली होती आणि सलग आठ हंगाम तो आपल्या संघासाठी खेळला. यादरम्यान तो दिल्ली संघाचा कर्णधारही होता. त्यानंतर तो उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळला. उन्मुक्त चंदने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्येही भाग घेतला, जिथे त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याला आयपीएलच्या 21 सामन्यांत केवळ 15 च्या सरासरीने 300 धावा करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT