India vs Australia | WTC Final 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Test Championship Format: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल! पण WTC स्पर्धा खेळवली जाते तरी कशी?

आयसीसीची टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा कशाप्रकारे खेळवली जाते, अंतिम सामन्यातील संघ कसे निश्चित होतात, हे जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC World Test Championship Format: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान, हे या स्पर्धेचे दुसरे पर्व आहे.

आयसीसीने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेला 2019 साली कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेत दर दोन वर्षांच्या कालावधीत या स्पर्धेचे एक पर्व खेळवले जाते. या स्पर्धेचे पहिले पर्व 2019 ते 2021 दरम्यान खेळवण्यात आले होते.

गेल्या दोन पर्वात या स्पर्धेत 9 संघ सामील झाले आहेत. सध्याच्या नियमानुसार कसोटी दर्जा मिळालेल्या अव्वल 9 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. गेल्या दोन पर्वांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, बांगलादेश हे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

या सर्व 9 संधांना या स्पर्धेअंतर्गत 2 वर्षांच्या कालावधीत 3 मायदेशात आणि 3 परदेशात कसोटी मालिका खेळायच्या असतात. या मालिकांमधील सामन्यांच्या निकालांवरून विजयाच्या टक्केवारीनुसार गुणतालिकेत संघांची क्रमवारी निश्चित होते.

त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी गुणही दिले जातात. जर संघांनी षटकांची गती कमी राखली, तर त्याचा परिणाम गुणांसह विजयाच्या टक्केवारीवरही होतो.

असे दिले जातात गुण

या स्पर्धेअंतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघाला विजयी सामन्यासाठी 12 गुण दिले जातात. तसेच बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी 6 गुण, अनिर्णित सामन्यासाठी 4 गुण दिले जातात. तर पराभूत संघाला एकही गुण मिळत नाही.

असे विभाजन विजयी टक्केवारीबाबातही होते. संघाने सामन्यात विजय मिळवल्यास 100 टक्के, बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी 50 टक्के, अनिर्णित सामन्यासाठी 33.33 टक्के आणि पराभूत सामन्याला 0 टक्के अशी विभागणी केली जाते.

असे ठरतात अंतिम संघ

सर्व 9 संघांच्या मालिकांनंतर संघांच्या विजयी टक्केवारीनुसार गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहणारे दोन संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतात. याच नियमानुसार 2021-23 पर्वात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्पर्धेअंतर्गत होणाऱ्या मालिकांचे आयोजन त्या त्या संघांच्या बोर्डाकडून केले जाते. आयसीसीकडून केवळ सामना अधिकारी पुरवले जातात आणि ही स्पर्धा नियम आणि अटींनुसार सामने खेळले जातायेत की नाही याची खात्री केली जाते. तसेच अंतिम सामन्याची जबाबदारी मात्र आयसीसीवर असते.

पुढील 8 वर्षातही होणार स्पर्धा

दरम्यान, आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 2023-25, 2025-27, 2027-29 आणि 2029-2031 या आठ वर्षात ही स्पर्धा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT