West Indies Test Team X/ICC
क्रीडा

AUS vs WI: वेस्ट इंडिजनेही जिंकलं गॅबाचं मैदान! तीन दशकांनी दिली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत मात

West Indies vs India: वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द गॅबा मैदानात झालेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मोठा पराक्रम केला आहे.

Pranali Kodre

West Indies won Gabba Test against Australia:

वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघाला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 8 धावांनी पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत वेस्ट इंडिने मालिकाही 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे.

वेस्ट इंडिजच्या विजयात शेमार जोसेफने 8 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र दुसऱ्या डावात स्टिव्ह स्मिथने 91 धावा करत दिलेली झुंज मात्र अपयशी ठरली.

वेस्ट इंडिजने जवळपास तीन दशकांनंतर, तब्बल 27 वर्षांनी ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी 1997 साली पर्थला वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभवाचा धक्का दिला होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आली नव्हती.

तसेच गेल्या 36 वर्षात दुसऱ्यांदाच ऑस्ट्रेलिया संघ गॅबाच्या मैदानात पराभूत झाला आहे. गेल्या 36 वर्षात वेस्ट इंडिजच्या आधी 2021 मध्ये याच मैदानात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने पराभवाचा धक्का देत मालिका जिंकली होती.

त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाची तीन दशके या मैदानावर अपराजीत राहण्याची मालिका खंडीत केली होती.

त्यानंतर आता वेस्ट इंडिजनेही ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गॅबा मैदानातच त्यांना पराभूत करण्याच पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे 36 वर्षांपूर्वी 1988 साली ऑस्ट्रेलियाला या मैदानात वेस्ट इंडिजनेच पराभूत केले होते.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन कसोटीत वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 108 षटकात सर्वबाद 311 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून या डावात जोशआ डा सिल्वा (79), केवम हॉज (71) आणि केविन सिनक्लेर (50) यांनी अर्धशतके केली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेडलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स, तर पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 53 षटकात 289 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरेने सर्वाधिक 65 धावा केल्या, तसेच कर्णधार पॅट कमिन्सने 64 धावा केल्या. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 22 धावांची आघाडी मिळाली होती.

पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच केमार रोचने 3 विकेट्स घेतल्या, तर शेमार जोसेफ आणि केविन सिनक्लेर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 72.3 षटकात 193 धावांवरच संपला. वेच इंडिजकडून किर्क मॅकेन्झीने सर्वाधिक 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जोश हेजलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 50.5 षटकात 207 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने नाबाद 91 धावा केल्या. तेसच कॅमेरॉन ग्रीनने 42 धावा केल्या. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

वेस्ट इंडिजकडून शेमार जोसेफने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या, तर जस्टीन ग्रेव्ह्सने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT