Nicholas Pooran and Brandon King Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 5th T20I: विंडीज दौऱ्याचा कटू शेवट! भारताचा पाचव्या टी-20मध्ये पराभव, मालिकाही गमावली

West Indies vs India: वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध पाचव्या आणि निर्णायक टी20 सामन्यात विजय मिळवत मालिकेवरही कब्जा केला. त्यामुळे सूर्यकुमारचे शानदार अर्धशतक व्यर्थ ठरले.

Pranali Kodre

West Indies Won 5th T20I match by 8 Wickets and clinch series against Team India:

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात रविवारी (13 ऑगस्ट) टी20 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना झाला. फ्लोरिडाला झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवत मालिकाही 3-2 अशा फरकाने जिंकली.

पाचव्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 18 षटकात 2 विकेट्स गमावत 171 धावा करत सहज पूर्ण केला आणि सामना जिंकला.

या सामन्यापूर्वी मालिकेत 2-2 अशी बरोबरी होती. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक होता. या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवल्याने त्यांनी 2016 नंतर पहिल्यांच भारताविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे.

दरम्यान, जवळपास 1 महिन्याच्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील हा अखेरचा सामना होता. या दौऱ्यात भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने, तर तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. पण टी20 मालिका भारताला 3-2 फरकाने पराभूत व्हावी लागली.

अखेरच्या टी20 सामन्यात भारताचा पराभव

भारताने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून काईल मेयर्स आणि ब्रेंडन किंग यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मेयर्सला दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने बाद केले. मेयर्सने 1 चौकार आणि 1 षटकारासह 10 धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतर मात्र ब्रेंडन किंग आणि निकोसल पूरन यांनी शतकी भागीदारी करत वेस्ट इंडिजसाठी विजयाचा मार्ग सुकर केला. त्यांची जोडी तिलक वर्माने तोडली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात निकोलस पूरनला बाद केले.

त्यामुळे त्याची आणि ब्रेंडन किंग यांच्यातील 107 धावांची भागीदारी तुटली. पूरनने 35 चेंडूत 47 धावांची खेळी केली. पण अर्धशतक केलेल्या ब्रेंडन किंगने त्याची लय कायम ठेवली.

त्याने शाय होपला साथीला घेत 18 व्या षटकात वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शाय होपने वेस्ट इंडिजसाठी विजयी षटकार मारला. ब्रेंडन किंग 55 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 85 धावांची खेळी केली. तसेच होप 22 धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताने सलामीवीर यशस्वी जयस्वाल (5) आणि शुभमन गिल (9) यांच्या विकेट्स पहिल्या तीन षटकांच्या आतच गमावल्या. या दोघांनाही अकिल होसेनने बाद केले.

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारताचा डाव पुढे नेला. त्यांनी 49 धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच तिलकला 27 धावांवर रोस्टन चेसने आपल्याच चेंडूवर झेल घेत माघारी धाडले.

त्यानंतर काहीवेळातच संजू सॅमसनही 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारला कर्णधार हार्दिक पंड्याने साथ देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सूर्यकुमारने अर्धशतक केले. पण हार्दिक 14 धावांवर बाद झाला. त्याला 17 व्या षटकात रोमारियो शेफर्डने बाद केले.

जेसन होल्डरने 18 व्या षटकात सूर्यकुमारला पायचीत पकडले. त्यामुळे सूर्यकुमार 45 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावा करून बाद झाला. यानंतर मात्र, शेफर्ड आणि होल्डर यांनी भारताच्या खालच्या फळीला फार काही करू दिले नाही. त्यामुळे भारताला 20 षटकात 9 बाद 165 धावाच करता आल्या.

वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच अकिल होसेन आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर रोस्टन चेसने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT