West Indies  AFP
क्रीडा

WI vs ENG: इंग्लंडची साडेसाती संपेना! दुसऱ्या T20I मध्येही वेस्ट इंडिजने उडवला विजयाचा बार

West Indies vs England: वेस्ट इंडिजने इंग्लंडला दुसऱ्या टी20 मध्येही पराभवाचा धक्का देत मालिकेत भक्कम आघाडी घेतली.

Pranali Kodre

West Indies vs England, 2nd T20I at Grenada, Result:

इंग्लंडचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. पण त्यांच्यासाठी हा दौरा संघर्षमय ठरताना दिसत आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका गमावल्यानंतर आता 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यातही पराभवाचा धक्का बसला आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (14 डिसेंबर) दुसरा टी20 सामना ग्रेनेडाला पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 10 धावांनी विजय मिळवत टी20 मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर विजयासाठी 177 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 7 बाद 166 धावाच करता आल्या.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांनी कर्णधार जॉस बटलरची (5) विकेट तिसऱ्याच षटकात गमावली. त्यानंतर फिलिप सॉल्ट आणि विल जॅक्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही त्यांना मोठी खेळी करता आली नाही.

सॉल्ट 25 धावांवर, तर जॅक्स 24 धावांवर अल्झारी जोसेफविरुद्ध खेळताना बाद झाले. लियाम लिव्हिंगस्टोनलाही (17) गुडाकेश मोतीने फार वेळ टिकू दिले नाही. तसेच हॅरी ब्रुकही 5 धावा करून माघारी परतला.

या विकेट्स जात असताना सॅम करनने चांगली फटकेबाजी केली. त्याने अर्धशतकही केले. पण त्याला 18 व्या षटकात अल्झारी जोसेफनेच बाद केले. त्यानंतर मात्र इंग्लंडच्या विजयाच्या आशेला धक्का लागला. त्याचच 19 व्या षटकात ख्रिस वोक्सही 2 धावांवर बाद झाला. सॅम करनने 32 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावांची खेळी केली.

अखेरीस मोईन अली आणि रेहान अहमदने फटकेबाजी करत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडपासून विजय 10 धावा दूर राहिला.

वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना अल्झारी जोसेफने 3 विकेट्स घेतल्या. तसेच अकिल हुसेनने 2 विकेट्स घेतल्या, तर जेसन होल्डर आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंग आणि काईल मेयर्सने चांगली सुरुवात केली. पण चांगल्या सुरुवातीनंतर मेयर्स 17 धाावांवर बाद झाला. पाठोपाठ निकोलस पूरन ५ धावांवर, शाय होप 1 धावेवर आणि शिमरॉन हेटमायर 2 धावांवर माघारी परतले. त्यामुळे एका क्षणी वेस्ट इंडिजची अवस्था 53 धावांवर 4 विकेट्स अशी होती.

मात्र त्यानंतर कर्णधार रोवमन पॉवेलने ब्रेंडन किंगची दमदार साथ दिली. या दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांनी अर्धशतकेही पूर्ण केली. अखेर त्यांची जोडी 16 व्या षटकात सॅम करनने तोडली. त्याने पॉवेलला हॅरी ब्रुकच्या हातून झेलबाद केले. पॉवेलने 28 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकार मारत 50 धावांची खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलने ब्रेंडन किंगची साथ दिली. पण 20 व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर अनुक्रमे रसेल (14) आणि जेसन होल्डर (0) यांनी विकेट्स गमावल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या.

ब्रेंडन किंग 52 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारून 82 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीमुळे तो या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला.

इंग्लंडकडून गोलंदाजीत आदील राशिद आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्स, सॅम करन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

Sourav Ganguly Head Coach: 'दादा' इन अ न्यू रोल! सौरव गांगुली बनला मुख्य प्रशिक्षक, 'या' संघाची जबाबदारी स्वीकारली

मातीची मूर्ती बनवा, 200 रुपये मिळवा! गोवा सरकारची अनोखी योजना; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT