Omkar Elephant returns to Goa news
Omkar ElephantDainik Gomantak

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Omkar Elephant: सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या रोमहर्षक मोहिमेत या भल्या मोठ्या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत परतवण्यात वन खात्याच्या पथकाला यश आले होते.
Published on

पेडणे : मोपा परिसरात आलेल्या ओंकार हत्तीला महाराष्ट्रातील हद्दीत सोडल्याने वन खात्याचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी सटकेचा सुस्कारा सोडला असतानाच काल रात्री सिंधुदुर्गातील डिंगणे मागें कुमयाचो व्हाळ-तोसें या गोव्याच्या हद्दीत पोहोचला.

नंतर रात्री या ओंकार हत्तीने फकीर पाटो येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीजवळील बागायतीत काही केळीची झाडे मोडून टाकली. नंतर रात्रीत हत्तीने आपला मोर्चा धुजगी येथे वळवला मंगळवारी (१६ सप्टेंबर) सकाळपर्यंत हा हत्ती येथील पेट्रोल पंपच्या मागील दाट झाडीत होता.

तो जेव्हा चालत होता तेव्हा हलणाऱ्या झाडांमुळे तो या ठिकाणी असल्याचे जाणवत होते. या ठिकाणी वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी या हत्तीवर पाळत ठेवून होते.

Omkar Elephant returns to Goa news
Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

काहीकाळ वाहतूक ठप्प

या भागात हत्ती आल्याचे हत्तीला बघण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर वाहने थांबविल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद पडली तर कडशी मोपा व धनगरवाडी या वस्तीवर जाणारी वाहतूकही बंद पडली. यामुळे या भागातील नोकरी व्यवसायानिमित्त शहरात जाणाऱ्यांना सक्तीची रजा घ्यावी लागली. वन खात्याचे कर्मचारी या हत्तीवर लक्ष ठेवून नाहीत.

Omkar Elephant returns to Goa news
Goa Tourism: किनारी पर्यटनाची वेगळ्या अर्थाने ओळख करून देणार पर्यटन मंत्री रोहन खंवटे

मोपा परिसरात 'ओंकार' हत्तीने स्थानिक ग्रामस्थ आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या रोमहर्षक मोहिमेत या भल्या मोठ्या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत परतवण्यात वन खात्याच्या पथकाला यश आले होते. पण, पुन्हा हा हत्ती गोव्याच्या हद्दीत आल्याने डोकेदुखी वाढली आहे.

शुक्रवारी (१२ सप्टेंबर) दुपारी ३.३० वाजता हा हत्ती नेतर्डे धनगरवाडी परिसरातून कडशी-मोपा मार्गे गोव्याच्या हद्दीत शिरला होता. त्यानंतर त्याने परिसरात खळबळ उडवून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com