Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: कोहली फक्त मैदानावरच किंग नाही, तर त्याचं हृदयही 'विराट'! पाहा फॅन्सबरोबरचा खास Video

Video: वेस्ट इंडिजमध्ये चाहत्यांबरोबर वेळ घालवतानाचा विराट, रोहित आणि सूर्यकुमारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Virat Kohli receive special gift from little fan In Barbados:

वेस्ट इंडिजने भारतीय क्रिकेट संघाला शनिवारी वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. दरम्यान, बार्बाडोस येथील ब्रिजटाउनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात झालेल्या या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत करोडोंचे मन जिंकले आहे.

शनिवारी दुसरा वनडे सामना सुरु होण्यापूर्वी विराटने मैदानात आलेल्या काही चाहत्यांची भेट घेतली. त्यावेळी त्याने त्यांच्याबरोबर सेल्फी काढले आणि चाहत्यांनाही स्वाक्षरी दिल्या. याशिवाय त्याला एका चिमुकल्या चाहतीने हाताने बनवलेले एक ब्रेसलेटही भेट दिले, जे विराटने आनंदाने स्विकारले.

विराटशिवाय रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवनेही चाहत्यांबरोबर सेल्फी काढले आणि स्वाक्षरीही दिल्या. या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. अनेकांच्या पसंतीसही हा व्हिडिओ उतरला असून लाखो लाईक्स आल्या आहेत.

दरम्यान, दुसऱ्या वनडेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नाही. सातत्याने ते क्रिकेट खेळत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे नाणेफेकीवेळी प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्याने माहिती दिली.

या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 36.4 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होपने 80 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावांची खेळी केली. तसेच केसी कार्टी 65 चेंडूत 4 चौकारांसह 48 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनीही नाबाद ९१ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून इशान किशनने 55 चेंडूत सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच शुभमन गिलने 34 धावा केल्या.

या दोघांशिवाय भारताकडून केवळ सूर्यकुमार यादवला 20 धावांचा टप्पा पार करता आला. सूर्यकुमारने 24 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताचा डाव 40.5 षटकात सर्वबाद 181 धावांवर संपुष्टात आला.

वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफने 2 विकेट्स घेतल्या, तर जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: गोव्यासाठी 3 दिवस यलो अलर्ट

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT