Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: कॅप्टन रोहित बॅटिंग करणाऱ्या ईशानवर अचानक भडकला अन् थेट डावच केला घोषित

India vs West Indies: ईशान किशनवर चिडल्यानंतर रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा पहिला डाव घोषित केल्याचे दिसले.

Pranali Kodre

Rohit Sharma lost cool on debutant Ishan Kishan: भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिकाला झालेला पहिला कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. याबरोबरच भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा ईशान किशनवर चिडताना दिसला.

हा ईशानचा पहिलाच कसोटी सामना होता. त्याने या सामन्यात यष्टीरक्षण करताना चांगली कामगिरी केली होती. मात्र, फलंदाजीसाठी त्याला दुसऱ्या दिवशी पूर्णवेळ वाट पाहावी लागली, त्यानंतर त्याला तिसऱ्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाली.

तिसऱ्या दिवशी विराट कोहली 76 धावांवर बाद झाल्यानंतर ईशान 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्यानंतर त्याने 19 चेंडू खेळले, तरी त्याला पहिली धाव काढता आली नव्हती. त्याने 20 व्या चेंडूवर त्याची पहिली धाव काढली.

याच गोष्टीमुळे रोहित त्याच्यावर वैतागलेला दिसत होता. तो डाव घोषित करण्यासाठी ईशानच्या पहिल्या धावाची वाट पाहात होता. अखेर ईशानने पहिली धाव काढताच रोहितने आणखी प्रतिक्षा न करता डाव घोषित केला. यावेळी त्याने ईशानवर नाराजीही व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्यानंतर रोहितने या घटनेबद्दल सांगितले. त्याने सांगितले की त्याला वाटत होते की डाव घोषित करण्यापूर्वी ईशानने धाव घ्यावी. तो फलंदाजी करण्यासाठी उत्सुक होता. त्याचमुळे अखेर ईशानने पहिली धाव काढताच त्याने डाव घोषित केला.

तथापि, भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला असला, तरी सर्वच भारतीय फलंदाजांनी धीम्यागतीने फलंदाजी केली होती. कारकिर्दीतील पहिले शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वाललाही पहिल्या धावेसाठी 16 चेंडू खेळावे लागले.

तसेच 171 धावांची खेळी करताना त्याचा स्ट्राईक रेट 44.19 राहिला, त्याचबरोबर रोहितनेही 103 धावांची खेळी 46.61 च्या स्ट्राईक रेटने केली. याशिवाय भारतीय डावात फलंदाजी करताना किमान 10 धावांचा टप्पा पार केलेल्या कोणत्याच खेळाडूला स्ट्राईक रेट 50 ठेवता आलेला नाही.

सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताने तिसऱ्या दिवशी पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला आणि 271 धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 50.3 षटकात 130 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला. तत्पुर्वी, वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

SCROLL FOR NEXT