India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 4th T20I: भारताने राखले विनिंग कॉम्बिनेशन, तर विंडीजमध्ये मोठे बदल, पाहा दोन्ही टीमची 'प्लइंग-11'

West Indies vs India: भारताविरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली असून प्लेइंग इलेव्हनमध्येही मोठे बदल केले आहेत

Pranali Kodre

West Indies vs India, 4th T20I, Playing XI: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लोरिडा येथे होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात विजय मिळवलेली भारताची प्लेइंग इलेव्हनच चौथ्या सामन्यासाठी कायम करण्यात आली आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजने मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले असून जेसन होल्डरचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय शाय होपलाही जॉन्सन चार्ल्सच्या जागेवर आणि ओडियन स्मिथला रोस्टन चेसच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

  • वेस्ट इंडिज - ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाय होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, ओबेद मॅककॉय

महत्त्वाचा सामना

दरम्यान, पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेत वेस्ट इंडिज सध्या तीन सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. पहिला सामना भारताने केवळ 4 धावांनी गमावला होता, तर दुसरा सामना भारताला 2 विकेट्सने गमवावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजने 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण तिसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत आव्हान कायम ठेवले.

तथापि आता चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला, तर वेस्ट इंडिज ही मालिकाही खिशात घालेल. तसेच, भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 2017 नंतर पहिल्यांदाच टी20 मालिका गमावेल. मात्र, जर भारताने चौथा सामना जिंकला, तर भारत मालिकेत बरोबरी साधेल, त्यामुळे 13 ऑगस्टला होणारा अखेरचा सामना निर्णायक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT