WI vs IND: हार्दिक पांड्याला राहुल द्रविडकडून सपोर्ट मिळत नाहीये, माजी यष्टीरक्षक फलंदाजाचा दावा

WI vs IND: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे.
Rahul Dravid & Hardik Pandya
Rahul Dravid & Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

WI vs IND: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका होत आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारतीय फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत संघात होत असलेल्या प्रयोगांवर क्रिकेट विश्वातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

हार्दिकच्या निर्णयांवर आणि खेळाडूंच्या निवडीवरही टीकेची झोड उठली आहे. यातच, भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने म्हटले की, हार्दिकला राहुल द्रविड नव्हे तर आशिष नेहरा (गुजरात टायटन्स) सारख्या 'सपोर्टिव्ह' प्रशिक्षकाची गरज आहे.

दरम्यान, हार्दिकने पहिल्याच प्रयत्नात (2022 सीझन) आयपीएलमध्ये गुजरात फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

तर यंदाच्या हंगामात हार्दिकचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, जिथे त्याला एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.

हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या कर्णधार-प्रशिक्षक जोडीचा फ्रँचायझीच्या सुरुवातीच्या यशात मोलाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून (Rahul Dravid) हवी तशी साथ मिळत नसल्याचे माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलला वाटते.

Rahul Dravid & Hardik Pandya
WI vs IND, T20I: निकोलस पूरन भारताला पुरून उरला, पण तरी ICC या कारणाने ठोठावला दंड

पार्थिवने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, "हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीबाबत अशी काही उदाहरणे आहेत, जिथे मोठ्या चुका झाल्या.

पहिल्या सामन्यात जेव्हा निकोलस पूरन फलंदाजीला आला तेव्हा त्याने पहिले षटक अक्षर पटेलला दिले तर दुसऱ्या सामन्यात यजुवेंद्र चहलला चौथे षटक न देऊन मोठी चूक केली.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) GT सोबत कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे, इथे आशिष नेहरा त्याला 'सपोर्टिव्ह' आहे. परंतु राहुल द्रविडकडून त्याला म्हणवी तशी साथ मिळत नाही.

Rahul Dravid & Hardik Pandya
WI vs IND, 3rd T20I: 'करो वा मरो' मॅचमध्ये तरी जयस्वालला संधी मिळणार? अशी असेल टीम इंडियाची संभाव्य 'प्लेइंग-11'

तो पुढे म्हणाला की, "टी-20 फॉरमॅट हा क्षणात चित्र पालटणारा खेळ आहे. दुसऱ्या सामन्यात चहलला चार षटकांचा कोटा पूर्ण न करु देणे मोठी चूक होती.'' या मालिकेत भारतीय संघ आता 0-2 ने पिछाडीवर आहे. मालिकेत तीन सामने बाकी असून भारताला मालिका जिंकायची असेल तर सर्व सामने जिंकावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com