Virat Kohli & Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: रोहित-यशस्वीची फिफ्टी, विराट शतकाच्या जवळ; पण 43 धावांत 4 विकेट्स घेत विंडिजचंही पुनरागमन

WI vs IND, 2nd Test: पहिल्या दिवशी भारताकडून यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावली.

Pranali Kodre

West Indies vs India 2nd Test, 1st Day Report: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात गुरुवारपासून (20 जुलै) त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु झाला आहे.

या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 84 षटकात 288 धावा झाल्या आहेत. पहिल्या दिवसाखेर भारताकडून विराट कोहली 87 धावांवर आणि रविंद्र जडेजा 36 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे आता विराट त्याच्या 76 व्या शतकापासून केवळ 13 धावा दूर आहे.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताकडून सलामीला उतरलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार फलंदाजी केली. जयस्वालने काहीसा आक्रमक अंदाज अवलंबला होता. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही झळकावली.

पण 32 व्या षटकात जेसन होल्डरने जयस्वालला चूक करण्यात भाग पाडले आणि किर्क मॅकेन्झीने त्याचा योग्य झेल टीपला. त्यामुळे जयस्वालला 9 चौकार आणि 1 षटकारासह 57 धावा करून माघारी परतावे लागले.

यानंतर मात्र वेस्ट इंडिजने चांगले पुनरागमन केले. त्यांनी जयस्वालला बाद केल्यानंतर पुढच्या 43 धावांत 4 विकेट्स मिळवल्या. 36 व्या षटकात शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला, तर ३९ व्या षटकात जोमेल वॉरिकनने रोहितला त्रिफळाचीत केले. रोहितने १४३ चेंडूत ८० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले.

दरम्यान, अजिंक्य रहाणेने संयमी खेळ करत विराट कोहलीची साथ देण्यास सुरुवात केली होती. पण तोही ५१ व्या षटकात ३६ चेंडूत ८ धावा करून माघारी परतला. त्यामुळे बिनबाद १३९ धावांवरून १८२ धावांत ४ विकेट्स अशी भारताची अवस्था झाली होती.

मात्र, नंतर जडेजाने विराटची चांगली साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारी रचली. तसेच पहिल्या दिवसाखेरपर्यंत वेस्ट इंडिजला आणखी यश मिळू दिले नाही.

वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात केमार रोच, शॅनन गॅब्रिएल, जोमेल वॉरिकन आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT