Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: अखेरच्या दिवशी पावसाचाच खेळ! विंडिजविरुद्ध सामना 'ड्रॉ', पण मालिका भारताच्या खिशात

WI vs IND: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला असला मालिकेत भारताने विजय मिळवला आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 2nd Test Draw: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे खेळवण्यात आला. हा सामना सोमवारी म्हणजेच सामन्याच्या पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला. त्यामुळे मालिका भारताने 1-0 अशी जिंकली.

पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. संपूर्ण दिवस पावसाचा अडथळा होता. त्यामुळे अखेर चौथ्या दिवशी ज्या स्थितीत सामना थांबला होता. त्याच स्थितीत सामना पाचव्या दिवशी पाऊस थांबण्याची बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर अनिर्णित घोषित करण्यात आला.

चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकात 2 बाद 76 धावा केल्या होत्या. तसेच शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी अद्याप 289 धावांची गरज होती, तर भारताला 8 विकेट्सची गरज होती. पण, शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही.

तथापि, या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. भारताने पहिल्या डावात 128 षटकात सर्वबाद 438 धावा केल्या.

भारताकडून विराट कोहलीने 121 धावांची शतकी खेळी केली. तसेच रोहित शर्मा (80), यशस्वी जयस्वाल (57), रविंद्र जडेजा (61) आणि आर अश्विन (56) यांनी अर्धशतके झळकावली. वेस्ट इंडिजकडून या डावात जोमेल वॉरिकन आणि केमार रोच यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 115.4 षटकात सर्वबाद 255 धावा केल्या. त्यामुळे भारताला १८३ धावांची मोठी आघाडी मिळाली होती.

या डावात वेस्ट इंडिजकडून कर्णधार क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. एलिक अथानाझ (37), तेजनारायण चंद्रपॉल (33) आणि किर्क मॅकेन्झी (32) यांनी 30 धावांचा टप्पा पार केला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली. भारताकडून रोहित शर्माने 44 चेंडूत 57 धावांची आणि इशान किशनने 34 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 38 धावा केल्या, तर शुभमन गिल 29 धावांवर नाबाद राहिला.

भारताने हा डाव 24 षटकात 2 बाद 181 धावा करत घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडीसह वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे आव्हान ठेवले. वेस्ट इंडिजकडून या डावात शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर ३६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 2 बाद 76 धावा केलेल्या असताना सामना थांबला. वेस्ट इंडिजकडून तेजनारायण चंद्रपॉल 24 धावांवर आणि जर्मेन ब्लॅकवूड 20 धावांवर नाबाद राहिले.

तसेच ब्रेथवेटने 28 धावांवर विकेट गमावली होती, तर किर्क मॅकेन्झी शुन्यावर बाद झाला. वेस्ट इंडिजच्या दोन्ही विकेट्स आर अश्विनने घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT