India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd T20I: जयस्वालचे पदार्पण होणार? हा खेळाडू होऊ शकतो बाहेर; पाहा भारताची संभाव्य Playing XI

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज संघात रविवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना गयानाला खेळला जाणार आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 2nd T20I, Probable Playing XI: भारत आणि वेस्ट इंडिज संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (6 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. हा सामना गयानामधील प्रोविडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने 4 धावांनी जिंकला होता. त्यामुळे सध्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही आघाडी वाढवण्यासाठी वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यातही विजयासाठी प्रयत्नशील असले, तर भारतीय संघही मालिकेत बरोबरी साधण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

पहिल्या टी20 सामन्यात भारताला खालच्या फळीत एका फलंदाजांची कमी भासली होती. त्यामुळे जर भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एक फलंदाज खेळवायचा ठरवल्यास यशस्वी जयस्वालचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण होऊ शकते.

पण यामुळे युजवेंद्र चहल किंवा कुलदीप यादव यांच्यातील एकाला बाहेर जावे लागू शकते. कारण हे दोघेही फिरकीपटू आहेत. तसेच फिरकी गोलंदाजी अक्षर पटेलही करतो. पण तो फिरकी गोलंदाजीबरोबरच तळात फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची जोखीम भारतीय संघव्यवस्थापन करण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, हा एक बदल वगळता दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारताकडून फलंदाजी फळीत इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन हे कायम राहू शकतात. तसेच कर्णधार हार्दिक पंड्याही फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत योगदान देऊ शकतो. वेगवान गोलंदाजांच्या फळीतरीही अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार कायम राहू शकतात.

या सामन्यात भारताला वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांकडून मोठ्या धावांच्या अपेक्षा असतील. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या यांना चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यांना त्याचा फायदा उचलता आला नव्हता.

तसेच वरची फळी झटपट बाद झाली होती. पण तिलक वर्माने पदार्पणातच चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातही कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

गयानामधील स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर भारताने तीन ऐवजी दोनच फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर तिलक वर्मा पार्ट टाईम गोलंदाजी करतानाही दिसू शकतो.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव / यशस्वी जयस्वाल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

Team India Squad T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा; ईशान किशनचं कमबॅक, गिलचा पत्ता कट

Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

Panaji Smart City: पणजी स्मार्ट सिटीचे 92.25% काम पूर्ण; Watch Video

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

SCROLL FOR NEXT