Mohammed Siraj and Shubman Gill Stunning Catches Dainik Gomantak
क्रीडा

Video: सिराजने दुखापतीचं टेंशन न घेता एका हाताने हवेत पकडला बॉल, तर गिलचाही जमिनीलगत भन्नाट कॅच

IND vs WI, 1st Test: मोहम्मद सिराज आणि शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत घेतलेल्या अफलातून कॅचने सर्वांचे लक्ष वेधले.

Pranali Kodre

Mohammed Siraj and Shubman Gill Stunning Catches: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुभमन गिलने घेतलेल्या झेलने सर्वांचे लक्ष वेधले.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान, 28 व्या षटकात सिराजने वेस्ट इंडिजचा फलंदाज जर्मेन ब्लॅकवूडचा झेल घेतला. तसेच गिलने 65 व्या षटकात जोमेल वॉरिकनचा झेल घेतला.

सिराजचा हवेत एकहाती झेल

या सामन्यात वेस्ट इंडिजची वरची फळी आर अश्विनने दिलेल्या धक्क्यांमुळे अडखळली होती. यातच रविंद्र जडेजानेही वेस्ट इंडिज फलंदाजांना संघर्ष करायला लावला. याचदरम्यान २८ व्या षटकात रविंद्र जडेजाने ब्लॅकवूडच्या रुपात वेस्ट इंडिजला चौथा धक्का दिला. पण या विकेटमध्ये जडेजाबरोबर सिराजचेही योगदान महत्त्वाचे राहिले.

जडेजाने गोलंदाजी केलेल्या 28 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ब्लॅकवूडने मिड-ऑफवरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फटका काहीसा चूकला. दरम्यान मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करणाऱ्या सिराजने हवेत सूर मारत एका हाताने झेल घेतला.

यानंतर तो जमिनीवर पडल्यामुळे त्याच्या हाताच्या कोपराला थोडे खरचटले. पण त्याने हातून चेंडू सुटू दिला नाही. त्यामुळे ब्लॅकवूडला 14 धावांवर विकेट गमवावी लागली. या विकेटसह या सामन्यातील पहिले सत्रही संपले होते.

गिलचाही भन्नाट झेल

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नियमित कालांतराने अश्विन आणि जडेजाच्या फिरकी गोलंदाजीसमोर विकेट्स गमावल्या होत्या. दरम्यान 65 व्या षटकात आर अश्विन गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला तिसऱ्या चेंडूने वळण घेतले. हा चेंडू सोडण्याचा वॉरिकन प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याच्या ग्लव्हजला लागला आणि शॉर्ट लेगला गेला.

यावेळी गिलने त्याच्या पुढच्या बाजूला सूर मारला आणि जमिनीलगत शानदार झेल घेतला. यावेळी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला. वेगवेगळ्या अँगलने रिप्ले पाहिल्यानंतर वॉरिकनला 1 धावेवर झेलबाद देण्यात आले. त्यामुळे अश्विनने त्याच्या 5 विकेट्सही पूर्ण केल्या. याबरोबरच वेस्ट इंडिजचा पहिला डावही संपुष्टात आला.

रोहित-जयस्वालची अर्धशतकी सलामी

दरम्यान, वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाकडून पहिल्या डावात रोहित शर्मा आणि पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनी चांगली सुरुवात दिली.

या दोघांच्या चांगल्या सुरुवातीमुळे भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 23 षटकात बिनबाद 80 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 70 धावांनी मागे आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या दिवशी 65 चेंडूत 30 धावा करून नाबाद आहे. तसेच पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल 73 चेंडूत 40 धावा करून नाबाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT