India vs Pakistan: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाणार पाकिस्तानला? BCCI अधिकाऱ्यानं स्पष्टच दिलं उत्तर

Asia Cup 2023: आशिया चषकाला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून भारत आणि पाकिस्तान संघ या स्पर्धेत आमने-सामने येणार आहेत.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

Arun Dhumal revealed venue for India vs Pakistan Asia Cup 2023 match: क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाचे वर्ष खास ठरणार आहे. कारण यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकापेक्षा अधिक सामने पाहायला मिळणार आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी हे कट्टर प्रतिस्पर्धी 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात आमने-सामने येणार आहेत.

यंदाचा आशिया चषक बऱ्याच चर्चांनंतर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये साखळी फेरीतील 4 सामने खेळवले जाणार आहे, अन्य 9 सामने श्रीलंकेत होतील.

दरम्यान, आशिया चषकाच्या तारखा आणि ठिकाण निश्चित झाले असले, तरी अद्याप भारत आणि पाकिस्तान सामन्यावरून चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी म्हटले होते की भारत जर पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानचा संघही वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही आणि तटस्थ ठिकाणाची मागणी करेल.

पण आता यावर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी उत्तर दिले असून आशिया चषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दलही मोठी अपडेट त्यांनी दिली आहे.

India vs Pakistan
World Cup 2023: स्टेडियम ठरवताना राजकारण झालं? BCCI उपाध्यक्ष म्हणतायेत, 'मुद्दाम गोष्टी...'

अरुण धुमाळ यांनी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामना श्रीलंकेत होणार आहे.

तसेच त्यांनी असेही सांगितले की दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रतिनिधी प्रमुख झाका अश्रफ यांची बैठक झाली असून यादरम्यान आशिया चषकाच्या अंतिम वेळापत्रकाला अंतिम रुप देण्यात आले.

धूमल म्हणाले, 'आमचे सचिव पीसीबी प्रमुख झाका अश्रफ यांना भेटले आणि आशिया चषकाचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले. ते आधी चर्चा केल्याप्रमाणेच आहे. पाकिस्तानमध्ये साखळी फेरीतील चार सामने होतील. बाकी नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत, यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या दोन्ही सामन्यांचा आणि जर दोन्ही संघ अंतिम सामन्यात खेळणार असतील तर त्या सामन्याचाही समावेश आहे.'

याशिवाय अरुण धूमल यांनी अहसान मजारी यांनी केलेल्या दाव्यालाही फेटाळून लावले आहे. त्यांनी सांगितले की 'कोणतीची अशी चर्चा झालेली नाही. जे रिपोर्ट्स समोर आलेत, तसे काहीही नाहीये. भारतीय संघही पाकिस्तानला जाणार नाही आणि आमचे सचिवही पाकिस्तानला जाणार नाहीयेत. जी बैठक झाली, त्यात फक्त वेळापत्रकाला अंतिम रुप देण्यात आले आहे.'

India vs Pakistan
Virat Kohli: 'तो माझा आवडता खेळाडू...', विराटनं वेस्ट इंडियन फॅन्सचा दिवस बनवला खास, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

दरम्यान, अशी चर्चा आहे की 14 जुलैला आशिया चषकाचे अंतिम वेळापत्रक समोर येऊ शकते. तसेच भारत आणि पाकिस्तान संघात श्रीलंकेतील डंबुलामध्ये सामना होऊ शकतो. तसेच पाकिस्तान त्यांच्या मायदेशात या स्पर्धेतील केवळ एक सामना खेळू शकतो. हा सामना नेपाळविरुद्ध असण्याची शक्यता दाट आहे.

तसेच पाकिस्तानात अन्य तीन सामने अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हे होऊ शकतात.

तसेच लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 2016 नंतर पहिल्यांदाच उपखंडात आशिया चषकाचे आयोजन होणार आहे. यापूर्वी 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या आशिया चषकाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये झाले होते.

त्याचबरोबर या आशिया चषकानंतर भारत आणि पाकिस्तान संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com