R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 1st Test: पहिल्याच दिवशी भारताचे वर्चस्व! आर अश्विनच्या 5 विकेट्स, तर जयस्वालची चौकाराने सुरुवात

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व राहिल्याचे दिसले.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st Test, 1st Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारी (12 जुलै) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला विंडसर पार्क, डॉमिनिका येथे सुरुवात झाली. या सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व दिसले.

पहिल्या दिवसाखेर भारताने 23 षटकात बिनबाद 80 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 70 धावांनी मागे आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या दिवशी 65 चेंडूत 30 धावा करून नाबाद आहे. तसेच पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल 73 चेंडूत 40 धावा करून नाबाद आहे. जयस्वालने त्याचे धावांचे खाते 16 वा चेंडू खेळताना चौकार मारत उघडले.

तत्पूर्वी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजकडून तेजनारायण चंद्रपॉल आणि कर्णधार क्रेग ब्रेथवेटने सलामीला चांगली सुरुवातही केली होती. पण त्यांची 31 धावांची भागीदारी आर अश्विनने चंद्रपॉलला 12 धावांवर त्रिफळाचीत करत तोडली.

त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजचे फलंदाज नियमित कालांतराने बाद झाले. ब्रेथवेटलाही अश्विनने 20 धावांवर बाद केले. केवळ वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणाऱ्या एलिक अथानाझने झुंज दिली, पण त्याला फारशी कोणाची साथ मिळाली नाही. तो 47 धावा करत अश्विनच्याच चेंडूवर बाद झाला.

दरम्यान, त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून केवळ ब्रेथवेटच 20 धावांचा टप्पा गाठू शकला. अन्य कोणाला 20 धावाही करता आल्या नाहीत. त्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला.

भारताकडून गोलंदाजीत फिरकीपटूंचे वर्चस्व दिसले. भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने या डावात 2.40 च्या इकोनॉमी रेटने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 1.90 च्या इकोनॉमी रेटने 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT