Yashasvi Jaiswal | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 1st Test: रोहित-जयस्वालची दमदार शतके! टीम इंडियाची मोठ्या आघाडीसह सामन्यावर भक्कम पकड

WI vs IND, 1st Test: दुसऱ्या दिवशी भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी शतके करत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st Test, 2nd Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत भारताने मजबूत पकड मिळवली आहे.

भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ 162 धावांनी आघाडीवर आहे. भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर सलामीवीर यशस्वी जयस्वाल 143 धावांवर आणि विराट कोहली 36 धावांवर नाबाद आहे.

दुसऱ्या दिवशी भारताने 24 व्या षटकापासून आणि बिनबाद 80 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी यशस्वी जयस्वाल 40 धावांवर आणि कर्णधार रोहित शर्मा 30 धावांवर नाबाद होते. या दोघांनीही पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही शानदार खेळ केला. या दोघांनीही द्विशतकी भागीदारीही केली.

दरम्यान जयस्वालने पदार्पणाच्या डावातच शतक करण्याचा कारनामा केला. त्याने 215 चेंडूंमध्ये त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्यानंतर लगेचच रोहितनेही चौकारासह 219 चेंडूत शतक पूर्ण केले. पण शतक पूर्ण झाल्यानंतर तो पुढच्याच चेंडूवर एलिक अथनाथविरुद्ध खेळताना जोशुआ दा सिल्वाकडे झेल देत बाद झाला.

त्याच्या विकेटवर वेस्ट इंडिजने रिव्ह्युची मागणी केली होती, ज्यात तो बाद असलेले दिसले. त्यामुळे रोहितला 221 चेंडूत 103 धावा करून माघारी परतावे लागले.

त्याच्यानंतर फलंदाजीला आलेला शुभमन गिल या डावात खास काही करू शकला नाही. त्याला ६ धावांवर जोमेल वॉरिकनने बाद केले. पण त्यानंतर विराट कोहलीने जयस्वालला चांगली साथ दिली. या दोघांनीही नंतर आणखी पडझड होऊ दिली नाही.

दरम्यान, विराटने संयमी खेळताना तब्बल 80 चेंडूंनंतर पहिली बाउंड्री मारली. या दोघांनी दुसऱ्या दिवसाखेर 72 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. आता जयस्वालला पहिल्याच डावात द्विशतक करण्याची संधी असणार आहे.

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

SCROLL FOR NEXT