Darren and Dwayne Bravo X
क्रीडा

Darren Bravo: संघात जागा न मिळाल्याने 34 व्या वर्षीच ब्रावोची निवृत्ती? सोशल मीडियावर केली खळबळजनक पोस्ट

Darren Bravo: ब्रोवोने सोशल मीडियावर पोस्ट करत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

West Indies Batter Darren Bravo decided to take break from the international Cricket:

वेस्ट इंडिजचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज डॅरेन ब्रावोने रविवारी (26 नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्याने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

वेस्ट इंडिज संघात जागा न मिळाल्याने त्याने निराश होत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिजकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

दरम्यान आता त्याने केवळ ब्रेक घेतला आहे की निवृत्ती घेतली आहे, याबद्दल मात्र अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये निवृत्तीबद्दल काही सांगितलेले नाही.

34 वर्षीय डॅरेन ब्रावोने वेस्ट इंडिजसाठी 56 कसोटी, 122 वनडे आणि 26 टी20 सामने असे मिळून 200 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 8 शतकांसह 3538 धावा केल्या आहेत, तर वनडेत 4 शतकांसह 3109 धावा केल्या आहेत.

नुकत्याच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या लिस्ट ए क्रिकेटच्या सुपर 50 कप 2023 देशांतर्गत स्पर्धेत त्याने 83.2 च्या सरासरीने 416 धावा फटकावल्या होत्या. यात एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याच्या या कामगिरीनंतरही त्याला आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी निवडलेल्या वेस्ट इंडिज संघात जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याने त्याची नाराजी स्पष्ट व्यक्त केली आहे.

'एक क्रिकेटपटू म्हणून माझे पुढचे पाऊल असायला हवे याचा विचार करण्यासाठी मी थोडा वेळ घेणार आहे. कारकिर्दीच्या या टप्प्यावर, हे नक्कीच सोपे असणार नाही किंना मी असे म्हणेल की माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी स्वत: ला एका स्थितीत ठेवण्यासाठी ऊर्जा, उत्कटता, वचनबद्धता आणि शिस्त शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.'

त्याने पुढे लिहिले “कोणत्याही प्रकारच्या संभाषणाशिवाय मला एका अंधाऱ्या ठिकाणी सोडण्यात आले. याक्षणी, तीन संघ आहेत, अनेक प्रकारांचे/मालिकांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते अंदाजे 40-45 खेळाडू आहेत आणि जर मी आमच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यानंतर आणि धावा केल्यानंतरही यापैकी कोणत्याही संघात असू शकत नाही, तर ते मुळात ते मला हेच सांगत आहेत की मी चुकीच्या भिंतीवर माझे नाव लिहित आहे.'

त्याने असेही म्हटले की त्याने अद्याप हार मानलेली नाही. त्याने पुढे लिहिले, 'मी अजूनही हार मानलेली नाही. पण मला वाटते की काही काळ बाजूला व्हावे आणि कदाचीत त्यावेळी युवा आणि प्रतिभाशाली खेळाडूंना संधी मिळेल. मी शेवटी सर्वांना शुभेच्छाच देईल.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डॅरेनचा मोठा भाऊ ड्वेन ब्रावोने देखील धाकट्या भावाला संघात संधी न मिळाल्याबद्दल स्पष्ट निराशा व्यक्त केली होती.

वेस्ट इंडिज 3 ते 21 डिसेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT