PT Usha on Wrestlers Protest Dainik Gomantak
क्रीडा

Wrestlers Protest: IOA अध्यक्ष पी.टी उषांकडून कुस्तीपटूंना दिलासा, ' अन्यायाला वाचा...'

भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाच्या आरोपावरुन कुस्ती महासंघांच्या अध्यक्षांविरोधात केलेल्या अंदोलानाबाबत IOA अध्यक्ष पी.टी उषा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Indian Wrestlers Protest: दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून भारताचे कुस्तीपटू अंदोलन करत आहेत. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

या अंदोलनात ऑलिम्पिक पदक विजेत्या बंजरंग पुनिया, साक्षी मलिक तसेच विश्व चॅम्पियन विनेश फोगट यांचाही समावेश आहे. आता यावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पी.टी उषा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

जंतर मंतरवर भारतीय कुस्तीपटू करत असलेल्या अंदोलनाची दखल पी.टी उषा यांच्याबरोबर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, बॉक्सर विजेंदर सिंग यांच्यासह अनेकांनी घेतली आहे. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने ब्रीजभूषण सिंग यांना उत्तर देण्यासाठी ७२ तास दिले आहेत.

(Welfare and well being of the athletes is the top most priority says P.T. Usha)

दरम्यान पी.टी उषा यांनी सांगितले आहे की 'आयओए अध्यक्ष म्हणून मी या प्रकरणावर कुस्तीपटूंशी चर्चा करत आहे. आमच्यासाठी खेळाडूंचे स्वास्थ्य आणि हित सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि अन्यायाला वाचा फोडा. आम्ही संपूर्ण तपास करून आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आम्ही अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी भविष्यात एक विशेष समीती नेमण्याचाही विचार केला आहे.'

पी.टी उषा यांनी असेही सांगितले आहे की त्यांना सरकारवर विश्वास आहे. तसेच त्यांनी सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना या प्रकरणात मदत करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणाबद्दल कुस्तीपटूंनी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचीही भेट घेतली आहे. त्यांनी आरोप केला आहे की नॅशनल कॅम्पमध्ये प्रशिक्षक, तसेच ब्रीजभूषण सिंग यांच्याकडून महिला खेळाडूंचे गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण होत आहे. तसेच याबाबत पुरावे असल्याचा दावाही भारतीय कुस्तीपटूंनी केला आहे.

दरम्यान, ब्रीजभूषण सिंग यांनी हे आरोप फेटाळले असून त्यांच्याविरुद्ध कारस्थान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ते शुक्रवारी दुपारी या प्रकरणाबद्दल पत्रकार परिषद घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT