PT Usha will be President of IOA: इंडियन ऑलिंपिक असोसिएशनला मिळणार पहिली महिला अध्यक्ष

पी. टी. उषा यांच्या नावावर शिक्कामोर्तब; 10 डिसेंबरला निवडणूक; उषा या एकमेव उमेदवार
PT Usha will be President of IOA
PT Usha will be President of IOADainik Gomantak
Published on
Updated on

PT Usha will be President of IOA: भारताच्या माजी धावपटु पी. टी. उषा या इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA - भारतीय ऑलिंपिक संघ) च्या नव्या अध्यक्ष होणार, हे जवळपास नक्की झाले आहे. IOAची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे. यात पी. टी. उषा या एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे IOAच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळणार हे नक्की आहे.

PT Usha will be President of IOA
Mehbooba Mufti slams BJP: गांधी-नेहरूंचा देश, भाजपचा होऊ देणार नाही!

राज्यसभेच्या खासदार असलेल्या पी. टी. उषा यांनी अध्यक्षपदासाठी रविवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह त्यांच्या पॅनेलमधील अन्य 14 जणांनीही विविध पदांसाठी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, अर्ज दाखल करण्याची मुदत रविवारी संपली. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस अर्ज दाखल करण्याची संधी होती, पण पहिल्या दोन दिवशी कुणाचेही अर्ज आले नव्हते. रविवारी मात्र विविध पदांसाठी 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात उपाध्यक्ष (महिला), संयुक्त सचिव (महिला) या पदासाठी निवडणूक होईल. कार्यकारिणी परिषदेच्या चार सदस्यांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.

PT Usha will be President of IOA
Rahul Gandhi Video: BJP, RSS विरोधात कसे लढणार? राहुल गांधींचा लाइव्ह डेमो, भाजपने उडवली खिल्ली

आयओए मध्ये एक अध्यक्ष अध्यक्ष, एक वरिष्ठ उपाध्यक्ष, दोन उपाध्यक्ष (एक पुरुष आणि एक महिला), एक कोषाध्यक्ष, दोन संयुक्त सचिव (एक पुरुष आणि एक महिला), अन्य कार्यकारी परिषद सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. यातील एक पुरुष आणि एक महिला असेल.

पी. टी. उषा यांनी अनेक आशियाई स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण पदक पटकाविले आहे. 58 वर्षीय उषा यांचे ऑलिंपिक पदक अगदी थोड्या सेकंदांनी हुकले होते. 1984 च्या ऑलिंपिक स्पर्धेत त्या 400 मीटर अडथळा शर्यतीत चौथ्या स्थानावर राहिल्या होत्या. त्यांचे ब्राँझपदक हुकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com