Punjab Kings Team Latest News  Dainik Gomantak
क्रीडा

चेन्नईविरुद्ध सामना जिंकल्याचे श्रेय या दोन गोलंदाजांचे : कर्णधार मयांक अग्रवाल

आयपीएलमध्ये सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात पंजाब संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव केला.

दैनिक गोमन्तक

आयपीएलमध्ये सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात पंजाब संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव केला. सलग दोन पराभवानंतर मिळालेल्या या विजयाने पंजाबला गुणतालिकेत आठव्यावरून सहाव्या स्थानावर नेले. अशा परिस्थितीत पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल या विजयानंतर खूप आनंदी दिसत होता. या विजयाचे श्रेय त्याने आपल्या दोन गोलंदाजांना दिले आहे. (We won match due to these two bowlers said Captain Mayank Agarwal)

मयांक म्हणाला, 'अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी केली. विजयाचे श्रेय मी त्याला देऊ इच्छितो. संपूर्ण हंगामात कठीण काळात तो आमच्यासाठी उपयुक्त ठरला. अशा परिस्थितीत तो नेहमी पुढे येतो आणि टीमचा कार्यभार सांभाळतो. तो आमच्यासाठी खूप खास आहे. कगिसो रबाडाही उत्कृष्ट होता. आम्हाला गायकवाड आणि रायडूच्या विकेट्सची नितांत गरज असताना त्यांनीच दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मी म्हणेन की हे दोन्ही गोलंदाज गेम चेंजर्स होते.'

एका क्षणी चेन्नईला विजयासाठी 24 चेंडूत 47 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट शिल्लक होत्या. चेन्नईचे फलंदाज ज्या पद्धतीने धावा करत होते, त्यावरून असे वाटत होते की चेन्नई सामना जिंकेल, पण येथून अर्शदीप आणि पंजाबच्या कागिसो रबाडा यांनी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली आणि तीन षटकांत केवळ 20 धावा दिल्या. 17व्या षटकात अर्शदीप 6 धावा, 18व्या षटकात रबाडा 6 धावा, एक विकेट आणि त्यानंतर 19व्या षटकात अर्शदीपने 8 धावा केल्या. या दोघांच्या अचूक गोलंदाजीमुळे चेन्नईला शेवटच्या षटकात २७ धावांचे लक्ष्य मिळाले, जे चेन्नईचे फलंदाज गाठू शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT