Shubman Gill and Virat Kohli scored century India vs Sri Lanka 3rd ODI
Shubman Gill and Virat Kohli scored century India vs Sri Lanka 3rd ODI Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: तिसऱ्या वनडेत कोहली-गिलचा राडा! पाहा सेंच्यूरी केल्यानंतरचे जोरदार सेलिब्रेशन; Video

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी शतकी खेळी केल्या. त्यामुळे भारताने तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी प्रथमदर्शनी योग्य ठरवला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी सलामीला 95 धावांची भागीदारी केली.

रोहित 42 धावांवर बाद झाल्यानंतरही विराट आणि शुभमन यांनी चांगला खेळ करत 131 धावांची भागीदारी केली. यादरम्यान गिलने त्याचे दुसरे वनडे शतक केले. तो 97 चेंडूत 116 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने 89 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले होते. यावेळी त्याने जल्लोषही केला.

(Virat Kohli and Shubman Gill both Scored Century during 3rd ODI against Sri Lanka)

गिल बाद झाल्यावर विराटने जबाबदारी घेत काही आक्रमक फटकेही खेळले. यादरम्यान त्याला श्रेयस अय्यरची दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळाली. या दोघांनी 71 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली.

या भागीदारीवेळी विराटने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 74 वे शतकही पूर्ण केले. त्याने 85 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले. त्याचे हे वनडेतील 46 वे शतकही ठरले. विराटने या शतकाला गवसणी घालताच नेहमीप्रमाणे जोरदार आनंदही साजरा केला.

विराटने यानंतरही एक बाजू सांभाळून ठेवली. मात्र श्रेयस 38 धावांवर बाद झाल्यावर केएल राहुल 7 आणि सूर्यकुमार यादव 4 धावांवर झटपट बाद झाले. पण तोपर्यंत भारताने धावफलकावर मोठी मजल मारली होती.

श्रीलंकेकडून या सामन्यात कसून रजिता आणि लहिरू कुमारा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच चमिका करुणारत्नेने एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT