India vs Sri Lanka, 2nd ODI: बीसीसीआयने 'या' खेळाडूवर खेळला मोठा डाव, पण...

India vs Sri Lanka, 2nd ODI: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, एक खेळाडू टीम इंडियासाठी विलन बनला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Sri Lanka, 2nd ODI: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, एक खेळाडू टीम इंडियासाठी विलन बनला आहे. वास्तविक, हा खेळाडू त्याच्या फ्लॉप कामगिरीमुळे मिळणाऱ्या सुवर्णसंधी वाया घालवत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बीसीसीआयने या खेळाडूला संधी देऊन स्वत:च्या पायावर दगड मारुन घेतला आहे. पुन्हा एकदा हा खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला या खेळाडूकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, पण तो मध्येच बाद झाला आणि संघाला अडचणीत आणले.

या खेळाडूला संधी देऊन बीसीसीआयने स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतला

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची धावसंख्या 9.3 षटकात 62/3 होती, तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर क्रीजवर आला. विराट कोहली 4 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतताच श्रेयस अय्यरही 28 धावा करुन श्रीलंकेचा गोलंदाज कसून रजिताचा बळी ठरला.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसून राजिताने श्रेयस अय्यरला आपल्या जाळ्यात अडकवून LBW आऊट केले. टीम इंडियात सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) वगळून सुवर्णसंधी मिळालेल्या श्रेयस अय्यरने एका फटक्यात सर्व काही उद्ध्वस्त केले. यासोबतच श्रेयस अय्यर दुसऱ्या वनडेत टीम इंडियासाठी खलनायक ठरला.

Team India
India vs Sri Lanka: हार्दिकने गमावला संयम, टीममेट्सविरुद्धच वापरले अपशब्द; Video व्हायरल

टीम इंडियाचा सर्वात मोठा खलनायक ठरला आहे

आता कर्णधार रोहित शर्मा रविवार 15 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला वगळून सूर्यकुमार यादवला संधी देऊ शकतो. श्रेयस अय्यरने आता सर्व संधी वाया घालवल्या आहेत. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरचे लीफ कटिंग निश्चित असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे झाल्यास, तो फलंदाजीत श्रेयस अय्यरपेक्षाही धोकादायक आहे. सूर्यकुमार यादव हा 360 डिग्रीचा फलंदाज आहे, जो मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून धावा करण्यात माहिर आहे.

आता टीम इंडियाकडून संधी मिळणे अशक्य

श्रेयस अय्यर त्याच्या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये खूपच सुस्त आहे. श्रेयस अय्यरने त्याच्या शेवटच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 3, 28 आणि 28 धावा केल्या आहेत. गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर फ्लॉप ठरला. तो केवळ 28 धावा करुन बाद झाला.

Team India
India vs Sri Lanka: टीम इंडियाला मिळाला खूंखार गोलंदाज, जस्सीच्या करिअरला मोठा धोका!

तसेच, दुसऱ्या वनडेतही श्रेयसने खराब कामगिरी करत कर्णधार रोहित शर्माचा विश्वास तोडला आहे. दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरही 28 धावा करुन बाद झाला. अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com